Mumbai Crime News : 9.5 लाखांचा गांजा जप्त; गुन्हे शाखेकडून एकाला अटक
•आरोपींकडून पोलिसांनी 9.52 लाख रुपये किंमतीचा 38 किलो गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई :- गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गांजाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला जेकब सर्कल सातरस्ता मुंबई परिसरातून ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांनी ,9 लाख 52 हजार 925 रुपये किंमतीचा 38 किलो 117 ग्रॅम गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी कक्ष-4, ॲन्टॉपहील यांनी कारवाई करत गांजा तस्करी करणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणाला त्याच्या घरातून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी कक्ष-4, ॲन्टॉपहील पथकाचे पोलीस हवालदार महाजन यांना मिळालेल्या बातमीदारामार्फत विठ्ठल निवास रूम नंबर 17 बी ब्लॉक तिसरा माळा जेकब सर्कल सात रस्ता मुंबई येथे एका व्यक्तीच्या घरात गांजा असून तो त्याच्या छोट्या छोट्या पुड्या बनवून ग्राहकांना विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्या घरावर छापा टाकल्या असता पोलिसांना त्यांच्या घरातून तब्बल 38 किलो 117 ग्रॅम गांजा त्याची किंमत नऊ लाख 52 हजार 925 रुपये आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याच्या विरुद्ध आग्रीपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीसीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 7 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आली आहे. आरोपी हा मागील एक वर्षांपासून गांजाची अशाच प्रकारे तस्करी करून विक्री करत असल्याची पोलिसांच्या तपासात माहिती समोर आली आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, (गुन्हे) लखमी गौतम,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मिना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डी) पश्चिम, प्रशांत राजे गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष -4 च्या प्रकटीकरण पोलिस निरीक्षक लता सुतार, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शामसुंदर भिसे, सहाय्यक फौजदार संजय परब, पोलीस हवालदार किशोर महाजन, महिला पोलीस हवालदार ज्योती शेटे, पोलीस शिपाई अनुपम जगताप, अनिल पवार,प्रभाकर वाघ, किरण चावरेकर, पोपट लाडबले यांनी केली आहे.