• High Alert on Independence Day: Bandra Unit Takes Down Ganja Smuggling Operation स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथक गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक केली आहे
मुंबई :- स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे बांद्रा युनिट यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था सखोल राखण्याकरिता एक मोहीम हाती घेतली होती. Questionable Findings: 47 Kgs of Ganja Seized by Bandra Police on Independence Day त्या अंतर्गत अंमली पदार्थाचे तस्करी करणाऱ्या एका आरोपीला बांद्रा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या युनिटने अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून जवळपास 33 लाख 98 हजार रुपये किंमतीचा 47 किलो पेक्षा जास्त वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट च्या रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे, बांद्रा युनिटचे पोलीस साकीनाका परिसरात गस्त घालत असताना एक संशयित व्यक्ती कार सह आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता वॉक्सवॅगन कारच्या डिक्कीमध्ये 47 किलो पेक्षा जास्त वजनाचा गांजा अंमली पदार्थ पोलिसांना सापडला आहे. Trending News: Bandra Police Unit Seizes 47 Kgs of Ganja on Independence Day ज्याची किंमत अंदाजे 33 लाख 98 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कक्ष युनिट येथे कलम 8 (क) सह 20 (क) एनडीपीएस कायद्यांतर्गत 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवैधपणे विक्रीसाठी आणलेल्या गांजा अंमली पदार्थ जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे.
पोलीस पथक
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, राजेंद्र शिरतोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष (गुन्हे शाखा) अंतर्गत बांद्रा युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, यांचे नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नितीन केराम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्रीकांत कारकर व बांद्रा युनिट पोलीस पथक यांनी केली आहे. Trendy : Mumbai Police Strikes on Independence Day : 47kg of Ganja Seized in Bust
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…