Mumbai Crime News : सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यावर दरोडा चालणारी टोळी गजाआड, 1.91 कोटी सोने जप्त; बांद्रा पोलिसांची कामगिरी

•क्रिशाला बॅन्डचे ॲडमिनीस्ट्रेशन ऑफीस या सोन्याच्या आणि हिऱ्याच्या दागिन्याच्या कारखान्यावर दरोडा घालणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना परिमंडळ-9 पोलिसांनी केले जेरबंद
मुंबई :- बांद्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टर्नर हाईट्स गुरुनानक रोड येथे समर्थ सुरेश बजाज (37 वय ) यांच्या मालकीचे क्रिशाला बॅन्डचे ॲडमिनीस्ट्रेशन ऑफीस असलेले सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यावर 8 मार्च ते 10 मार्च च्या दरम्यान दरोडा घालून त्यामधील हिरेझडीत दागिन्याची चोरी केल्याची तक्रार बजाज यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका टोळीतील दोन सदस्यांना अटक केली असून त्यांच्याकडून एक कोटी 91 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त परिमंडळ-9 यांनी 7 पथक तयार करून या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र मेहनत करून तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदाराच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या टोळीतील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तांत्रिक आणि भौतिक पुराव्याच्या आधारे आरोपींच्या मागवा काढत गुन्ह्यातील दोन आरोपींना मुंबईच्या चोर बाजार परिसरातून अटक केली आहे. दोन्ही आरोपी पैकी एक आरोपी छत्तीसगड तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेश राज्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.आर्या प्रताप नाग उर्फ दिपक धु, (वय 31) आणि रविद्र कुमार गुप्ता उर्फ सलमान शेख, (वय 46) असे आरोपींची नावे आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळू 1810 ग्रॅम सोने व हिऱ्याचे दागिने असा एकूण एक कोटी 91 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती,पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग परमजितसिंग दहिया, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-9 दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त, वांद्रे विभाग अधिकराव पोळ यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे, पोलीस निरीक्षक अजय लिंगपुरकर यांचे अधिपत्याखाली परीमंडळ-09 मधील गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग जगताप, विजय आचरेकर, तुषार सावंत, रणजित चव्हाण, अभिषेक पाटील, दत्तात्रय कोकणे, सुनित घाडगे, पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील, हणमंत कुंभारे व बांद्रे पोलीस ठाणे, सांताक्रुझ पोलीस ठाणे, खार पोलीस ठाणे, डी.एन नगर पोलीस ठाणे, अंबोली पोलीस ठाणे, जुहू पोलीस ठाणे तील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी उत्कुष्ठ कामगीरी पार पाडली आहे.