Mumbai Crime News : फरार आरोपीला 29 वर्षांनंतर अटक
•मोहम्मद रफिक उर्फ बाबा अब्दुल सत्तार शेख (63 वय ) असे या आरोपीचे नाव असून तो ॲन्टॉपहील परिसरातील म्हाडा वसाहत परिसरात वास्तव्यास होते
मुंबई :- गेले 29 वर्ष फरार असलेल्या आरोपीला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मोहम्मद रफिक उर्फ बाबा अब्दुल सत्तार शेख अतिरिक्त सत्र न्यायाधीश शहर दिवाणी सत्र न्यायालय मुंबई यांच्याकडून अजामीन पात्र वॉरंट काढण्यात आला होता.
स्थायी अजामीनपात्र वॉरंट हे आरोपी मोहम्मद रफिक उर्फ बाबा अब्दुल सत्तार शेख (गुन्हा घडलेल्या वेळी दिलेला पत्ता रा.अशियाना बिल्डींग आदम मिस्त्री लेन परेल मुंबई 12) याचे नावे प्राप्त झाले.
वॉरंट हे बजावणीकरीता भोईवाडा पोलीस ठाणेस वर्ग करण्यात आले. आरोपी हा या गुन्हयात फरारी असल्याने तसेच तो भोईवाडा पोलीस ठाण्यात कलम 342,394,326,34 भादवि या गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी असल्याने त्याचा शोध घेणेकामी एक विशेष पथक तयार करण्यात आले.
पथकाने नमूद आरोपीचा शोध घेण्याकरीता सर्वप्रथम जुनी कागदपत्रे प्राप्त करून त्याचे पडताळणी केली तसेच त्यामध्ये नमूद असणारे त्याचे मित्र व नातेवाईक यांची माहिती प्राप्त केली. माहिती प्राप्त करत असतानाच आरोपी हा काही काळ ओरिसा राज्य तसेच काही काळ जम्मू कश्मीर येथे वास्तव्यास असल्याचे कळून आले. अधिक माहिती घेतली असता सदरचा आरोपी हा मुंबईत देखील येवून सर जे. जे मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील चोर बाजार येथून जुन्या दुर्मिळ वस्तु, तसेच झुंबर विकत घेवून ते इतरत्र राज्यात जावून विकत असल्याची माहिती मिळाली त्यामध्येच नमूद पथकास 24 ऑक्टोबर रोजी खात्रीलायक सुत्रांकडून अशी माहिती मिळाली की, नमूद आरोपी हा त्याचे नातेवाईकांना भेटण्याकरीता ॲन्टॉप हिल येथे येणार आहे.त्याप्रमाणे पोलीस पथकाने तेथे पाळत ठेवून सदर आरोपीशी मिळता जुळता वर्णणाचा व्यक्ती मिळून आल्याने त्यास पोलीस ठाणेस आणुन त्याचेकडे चौकशी केली असता तो आरोपी हा मोहम्मद रफिक उर्फ बाबा असल्याची खात्री झाल्याने वरीष्ठांना अवगत करून त्यास फेरअटक करण्यात आले.
आरोपीचा नाव व पत्ता
मोहम्मद रफिक उर्फ बाबा अब्दुल सत्तार शेख (63 वय सध्याचा पत्ता म्हाडा वसाहत शेख मिस्त्री दर्गा स्टीट रोड ॲन्टॉप हिल मुंबई )
आरोपीचा सहभाग असलेल्या गुन्हयांची माहिती
1.भोईवाडा पोलीस ठाणे, 307 भादवि यामध्ये फरारी आहे.
2.भोईवाडा पोलीस ठाणे, 342,394,323,34 भादवि मध्ये पाहीजे आरोपी आहे.
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग अनिल पारसकर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 4, रागसुधा आर, सहायक पोलीस आयुक्त, भोईवाडा विभाग कुमुद कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाईवाडा पोलीस ठाणे सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (का व सु) सोपान भाईक, पोलीस उप निरीक्षक माधुरी पाटील, पोलीस उप निरीक्षक मधुकर पवार, पोलीस हवालदार चव्हाण, म्हात्रे यांनी पार पाडली आहे.