मुंबई

Mumbai Crime News : ऑनलाईन मोबाईल खरेदीत 1.60 हजार रुपयाची फसवणूक

•सायबर पोलिसांची दमदार कामगिरी फसवणुकीतील संपूर्ण रक्कम मूळ खातेदाराला परत मिळवून देण्यास यश

भाईंदर :- अलिकडील काळात अनेक कामे ऑनलाईन होऊ लागल्याने वेळ आणि श्रम कमी होऊ लागले आहेत. मात्र ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. परंतु, नवघर पोलीस ठाण्याच्या आधीच राहणाऱ्या एका तरुणाची ऑनलाईन मोबाईल खरेदी करताना फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तरुणाने एक लाख 60 हजार रुपये किंमतीचा मोबाईल ऑनलाईन ऑर्डर केला होता. परंतु कित्येक दिवस जाऊनही मोबाईल घरी न आल्याने आपले आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणारे बेरा यांनी ऑनलाइन मोबाईल खरेदी करण्याकरिता ऑनलाईन खरेदी करण्यासाठी एक लाख साठ हजार रुपये पाठवले होते. परंतु मोबाईल न आल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात त्यांनी सायबर पोलिसांना तक्रार केली. पोलिसांनी NCCRP Portal वर तक्रार नोंदवल्यानंतर फसवणुकीची वर्ग झालेली रक्कम संशयित बँक खात्यात थांबवण्यात आली. तक्रारदारांनी रक्कम ऑनलाइन ई-कॉमर्स वरून पुढे वर्ग केल्याचे दिसून आले. पोलिसांनी संबंधित रक्कम गोठविण्यात यश आले. त्यानंतर बँक आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संपूर्ण रक्कम मूळ खातेदाराच्या खात्यात जमा केली आहे.

पोलीस पथक
अविनाश अंबरे
, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली साबयर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार विलास खाटीक, राहुल बन, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे यांनी पार पाडली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago