Mumbai Crime News : “वडिलांचा मित्र बोलतोय”, असे सांगून फसवणूक करणारा गुन्हेगार बिहारमधून अटकेत
•डॉ. डि.बी. मार्ग पोलीस ठाणे, येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल, पोलिसांच्या पथकाने बिहारच्या औरंगाबाद मधून आरोपीला केले अटक
मुंबई :- वडिलांचा मित्र बोलत असल्याचे सांग मला त्यांना पैसे द्यायचे होते परंतु त्यांच्या खात्यात माझ्याकडून चुकून जास्त पैसे गेले असे खोटे सांगून फसवणूक करणारा एका व्यक्तीला डॉ. डि.बी. मार्ग पोलीस ठाणे पोलिसांनी बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातून अटक केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरोपी हा 23 वर्षाचा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. डि.बी. मार्ग पोलीस ठाण्यात 5 एप्रिल 2024 रोजी एका अनोळखी व्यक्तीने वडिलांचा मित्र असल्याचे खोटे सांगून फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम 419, 420 भादवि सह कलम 66 (क),66 (ड) कलम आय.टी ॲक्ट 2000 गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने फिर्यादी याला वडीलांचे पैसे दयायचे असल्याचे खोटे सांगून, त्याने त्यांच्या खात्यावर ज्यादा पैसे पाठविले असल्याचे टेक्स मेसेज पाठवून, फिर्यादींना गुगल पे कमांक यावर 45 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. फिर्यादीची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली.
आरोपी हा त्याचे अस्तित्त्व लपवुन राहत होता. गुन्हा दाखल झाल्यापासुन सतत यातील आरोपीच्या ठावठिकाण्याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास करण्यात येत होता. आरोपीचा तांत्रिक पद्धतीने शोध घेतला असता, आरोपी हा औरंगाबाद, बिहार येथे वावरत असल्याचे दिसून येत होते. 15 ऑक्टोबर रोजी, पोलीस ठाणे पातळीवर एक टीम तयार करण्यात येवून टीमला तात्काळ वरिष्ठांच्या परवानगीने औरंगाबाद, बिहार येथे रवाना करण्यात आले. तांत्रिक व स्थानिकांच्या मदतीने कार्यवाही करण्यात आली. त्यास स्थानिक बारून पोलीस ठाणे,( बारून, औरंगाबाद, बिहार) यांच्या मदतीने मंगरहीया परिसरात सापळा लावून शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात येवून त्यास ट्रान्झिट रिमांड सह व्यवहार न्यायालय, औरंगाबाद, बिहार येथे हजर करण्यात आले. आरोपीस गिरगांव न्यायालयात हजर केले असता त्यास दिनांक 25 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस पथक
डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई, डॉ. मोहीतकुमार गर्ग, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-2 यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम डिगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश आरडक, वैभव गुरव, पोलीस हवालदार आंनद गावडे, पोलीस शिपाई सूरज धायगुडे, चैत्राम पावरा, संतोष केदारी यांनी पार पाडली.