•कौटुंबिक समस्येने त्रस्त असलेल्या महिलेवर ‘भूतबाधेचा’ बहाणा; तांत्रिक विधीच्या नावाखाली केले घृणास्पद कृत्य
मुंबई :- कौटुंबिक आणि शारीरिक समस्यांनी त्रस्त असलेल्या एका 32 वर्षीय महिलेवर उपचाराच्या नावाखाली बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील सांताक्रुझ येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी भोंदू बाबा अब्दुल रशीद (45 वय) याला अटक केली आहे.
पीडित महिला गेल्या काही काळापासून त्रासात होती. याच संधीचा फायदा घेत अब्दुल रशीद नावाच्या एका भोंदू बाबाने तिला आपल्या जाळ्यात ओढले. “तुझ्यावर भूतबाधा झाली आहे,” असे सांगून तांत्रिक विधी करून ती दूर करता येते, असे त्याने महिलेला पटवून दिले. तिच्या त्रासाचा गैरफायदा घेत त्याने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कथित उपचारासाठी तिला एका ठिकाणी बोलावले.
‘उपचाराचा’ गैरसमज आणि फसवणूक
तांत्रिक विधीचे नाटक करून आरोपी अब्दुल रशीदने महिलेवर बलात्कार केला. सुरुवातीला पीडित महिलेला हा एक उपचाराचाच भाग असावा, असा गैरसमज झाला होता. परंतु, नंतर तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने लगेच मंगळवारी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अब्दुल रशीदला बुधवारी अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 आणि 64 (2) अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचसोबत, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्याच्या (अंधश्रद्धाविरोधी कायदा) कलमांअंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा अशा भोंदू बाबांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडता योग्य आणि वैज्ञानिक मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांताक्रुझ पोलीस करत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…