मुंबईठाणे
Trending

Mumbai Crime News : मुंबईत निवडणुकीला हिंसक वळण: वांद्रे येथे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ला!

Mumbai Bandra Crime News : प्रचार रॅलीत अज्ञाताने हाजी सालिम कुरेशी यांच्या पोटात खुपसला चाकू; वांद्रे परिसरात तणाव, पोलीस बंदोबस्त तैनात

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच, वांद्रे पूर्व परिसरात रक्ताचा सडा पडला आहे. शिवसेना (शिंदे गट) प्रभाग क्रमांक 92 चे अधिकृत उमेदवार हाजी सालिम कुरेशी यांच्यावर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कुरेशी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ज्ञानेश्वर नगरात रॅली दरम्यान हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, हाजी सालिम कुरेशी बुधवारी वांद्रे येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचार फेरी काढत होते. रॅलीमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात…
[7:22 pm, 7/1/2026] Anirudha Mm: अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस युती नाहीच; नरेंद्र पवारांचे स्पष्टीकरण, मुख्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा कायम!

•”काँग्रेसने विनाअटी समर्थन दिले, आम्ही पाठिंबा मागितला नाही”; सत्तेच्या समीकरणावरून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

अंबरनाथ | अंबरनाथ नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत “अशी युती मान्य नाही” असे स्पष्ट केल्यानंतर, अंबरनाथमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. “ही कोणतीही अधिकृत युती नसून काँग्रेसने केवळ विकासासाठी भाजपला समर्थन दिले आहे,” असे पवार यांनी म्हटले आहे.

“आम्ही पाठिंबा मागितला नाही”

नरेंद्र पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते, ज्यात सत्ता भाजपच्या हाती आली आहे. “नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे या सुशिक्षित असून, अंबरनाथचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी काँग्रेस आणि इतर घटकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही काँग्रेसकडे कधीही पाठिंबा मागितला नव्हता, त्यांनी स्वतःहून विनाअटी समर्थन दिले आहे. त्यामुळे याला राजकीय युती म्हणणे चुकीचे ठरेल,” असे स्पष्टीकरण पवारांनी दिले.

शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांविरुद्ध जनतेचा रोष?

यावेळी पवारांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. “अंबरनाथमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती, मात्र स्थानिक नेत्यांच्या कारभारावर जनता नाराज होती. त्यामुळेच लोकांनी भाजपला सक्षम पर्याय म्हणून निवडले आहे. काँग्रेसला आम्ही सत्तेत कोणताही वाटा किंवा पद दिलेले नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस कारवाईवर ठाम नरेंद्र पवारांनी स्पष्टीकरण दिले असले तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, “स्थानिक पातळीवर अशा प्रकारे काँग्रेस किंवा एमआयएमशी हातमिळवणी करणे पक्षशिस्तीच्या विरोधात आहे. ही युती मोडावी लागेल आणि ज्यांनी हा निर्णय घेतला, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”

पक्षश्रेष्ठींचा आदेश अंतिम

नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर बोलताना सांगितले की, “पक्षाचा आदेश आम्हाला नेहमीच बंधनकारक आहे. जरी अंबरनाथमध्ये विकासासाठी समर्थन घेतले गेले असले, तरी वरिष्ठ पातळीवरून जर हा पाठिंबा नाकारण्याचे आदेश आले, तर आम्ही त्याचे पालन करू. पक्ष नेतृत्वाचा निर्णय शिरसावंद्य असेल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0