•Drugs worth Rs 6.19 crore seized in Mumbai मुंबई परिमंडळ 6 च्या पथकाची कारवाई ; गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक
मुंबई :- अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत आरोपीला परिमंडळ-6 च्या पथकाने अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी 6.19 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
गोवंडी शिवाजी नगर परिसरातील कमला रमण नगर परिसरात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याची माहिती परिमंडळ-6 च्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सलमान शेख (23 वय) याच्या घरी छापा घातला. यावेळी पोलिसांना त्याच्या घरात साडेतीन किलो एमडी, बारा किलो गांजा आणि कोडेन सिरफ,रोख रक्कम असा एकूण 6 कोटी 19 लाख 48 हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा सापडला.
आरोपी सलमान इजहार शेख याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…