मुंबई

Mumbai Crime News : जुहूतील ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश — दीड कोटींचा कोकेन व एक्स्टॅसी (MDMA) जप्त

•गुप्त माहितीवरून अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई, आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई :- मुंबईतील जुहू, अंधेरी (पश्चिम) परिसरात कोकेन आणि एक्स्टॅसी (MDMA) या अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक करत पोलिसांनी दीड कोटी रुपयांचा माल जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटने 12 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सेंट जोसेफ शाळेजवळ छापा टाकला. आरोपीकडून 143 ग्रॅम कोकेन आणि 13 ग्रॅम MDMA टॅबलेट्स मिळून एकूण 1 कोटी 46 लाख 90 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत आरोपी हा गेल्या काही महिन्यांपासून जुहू व अंधेरी परिसरात उच्चभ्रू ग्राहकांना लक्ष्य करत कोकेन व MDMA चा पुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या मते, आरोपीच्या संपर्कात आणखी काही जण असल्याचा अंदाज असून, या जाळ्याचा विस्तार उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांच्या विक्रीसंबंधी कोणतीही माहिती त्वरित (९८१९१११२२२) किंवा राष्ट्रीय हेल्पलाईन (१९३३) वर कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव व तपशील पूर्णपणे गोपनीय ठेवले जातील, अशी हमी देण्यात आली आहे.

ही कारवाई मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त लखमी गौतम, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उप आयुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या देखरेखीखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0