क्राईम न्यूज

Mumbai Crime News : अंमली पदार्थ गुन्ह्यातील ३ वर्षांपासून फरार आरोपीला खंडणी विरोधी पथकाने जेरबंद

मुंबई, १२ सप्टेंबर २०२५ – खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, मि.भा.व.वि. यांनी अंमली पदार्थाच्या गुन्ह्यातील ३ वर्षांपासून फरार आरोपी सलमान अनवर शेख (वय २६, रा. गीता नगर, मिरा रोड) याला जेरबंद करण्यात यश मिळवले. Mumbai Latest Crime News

नबानगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४९७/२०२२ एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत १० जुलै २०२२ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी होता. या गुन्ह्यातील इतर तीन आरोपींना अलीकडेच न्यायालयाने दोषी ठरवून ५ ते १० वर्षांचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सलमान शेख हा गेली तीन वर्षे स्वतःची ओळख लपवून मिरा रोड, भाईंदर व वसई परिसरात अधूनमधून वास्तव्य बदलत होता. तो डिलिव्हरी बॉय म्हणून विविध नावांनी काम करीत असल्याची माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक शकील पठाण यांना मिळाली होती. दोन महिन्यांच्या गुप्त तपासानंतर अखेर १२ सप्टेंबर रोजी भाईंदर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी नयानगर पोलीस ठाण्यात हजर करून अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपआयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कामगिरीत खंडणी विरोधी पथकातील प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांच्यासह सपोनि विलास कुटे, सपोनि विजयेंद्र आंबवडे, पोउनि ओंकार कोये, सहा.पो.उपनि. शकील पठाण व त्यांच्या पथकाचा सक्रिय सहभाग होता.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago