मुंबई

Mumbai Crime News : डिजिटल अरेस्टपासून ‘डिजिटल रक्षकांनी केली सुटका

•मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाची दमदार कामगिरी डिजिटल अरेस्ट असलेल्या आतापर्यंत पाच जणांना सायबर पोलिसांच्या डिजिटल रक्षकाची मिळाली मदत

मुंबई :- सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून ऑनलाइन नोकरी, शेअर ट्रेडिंग, फिशिंग, क्रेडिट कार्ड, सेक्सटॉर्शन, कर्ज आणि विवाहसंबंधी फसवणूक होत असताना आता डिजिटल अरेस्टचेही गुन्हे वाढत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी हे आपण नामांकित कुरियर कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवत नागरिकांना त्यांच्या नावे आंतरराष्ट्रीय कुरियर अथवा पार्सल आल्याचे सांगतात. त्या कुरियरमध्ये ड्रग्ज, शस्त्रे, बनावट पासपोर्ट, अवैध सीमकार्ड, हवालाद्वारे आलेली रक्कम असल्याचे सांगून घाबरवतात. त्यानंतर त्यांचेच साथीदार ते पोलीस, आयकर, आयबी, सीबीआय, ईडी आदी विभागाचे अधिकारी असल्याचे भासवत अटक करण्याची धमकी देत पैसे पाठवण्यास भाग पाडतात. त्यासाठी बनावट ओळखपत्रे, वॉरंट, समन्स दाखवतात. अशा प्रकरणात वेळीच मदत करण्यासाठी डिजिटल रक्षकचे दोन्ही क्रमांक चोवीस तास कार्यरत राहाणार आहेत. 16 एप्रिल पासून डिजिटल रक्षक हेल्पलाइन सुविधा सुरू करण्यात आली होती या सुविधाच्या माध्यमातून सायबर पोलिसांनी डिजिटल अरेस्ट असलेल्या पाच जणांची सुटका केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चेंबुर मुंबई येथे राहणारे जेष्ठ नागरिक यांना व्हॉटस्अपद्वारे व्हिडीओ कॉल करून समोरून बोलणा-या व्यक्तीने तो सी.बी.आय. अधिकारी असल्याचे सांगीतले.तसेच आपल्या बँक खात्यांवरून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर ट्रान्झेक्शन झाल्याचे सांगून त्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड हवाला व्यवहारामध्ये आढळल्याचे कळविले. हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षिततेशी सबंधित असून याबाबत कोणाला काहीही सांगू नका असे धमकावून आपल्याला कधीही अटक होवू शकते असे सांगुन भीती निर्माण केली.अधिक पुरावा म्हणून सी.बी.आय. व ई.डी. कार्यालयामार्फत आपल्यानावे नोटीसा जारी करण्यात आल्या असून सदरच्या नोटीसा त्यांना व्हाटस्‌अप‌द्वारे पाठविल्या व त्यांना व्हिडीओ कॉल बंद न करण्याची धमकी देवून आपल्याला डिजीटल अरेस्ट करण्यात येत असून सिक्युरीटी डिपॉझीट म्हणून काही रक्कम ट्रान्सफर करावी लागेल असे धमकी देवून पुढील आदेशाप्रमाणे काम करण्यास सांगितले. हा प्रकार सुरू असतांना तक्रारदार यांची मुलगी घरात आली असता तीला वडील घाबरलेल्या व भेदरलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांना विचारणा करून तात्काळ मुंबई पोलीस डिजीटल रक्षक हेल्पलाईन (740008666) वर कॉल करून माहिती दिली तसेच सी.बी.आय. व ई.डी. कडून त्यांना प्राप्त झालेल्या नोटीसा ख-या आहेत किंवा कसे या बाबत विचारणा केली असता पोलीसांनी तात्काळ सदरच्या नोटीसा व्हाट्सअप द्वारे डिजीटल रक्षक क्रमांकावर मागवून त्यांची शहानिशा करून त्या बनावट असल्याचे सांगून तक्रारदार यांचे समुपदेशन केले.

पोलीस पथक

देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त, गुन्हे, शशीकुमार मिना, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे, सायबर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली दत्ताराम चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पश्चिम सायबर,ठाणे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती बावस्कर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सोनावणे, महिला पोलीस शिपाई सोनाली काकड यांच्या डिजीटल रक्षक पथक, यांनी पार पाडली आहे

vivek

Recent Posts