•अत्युच्च शिक्षण, नोकरी गेली आणि चोरीचा मार्ग पत्करला
मुंबई :- आयुष्यातील चढ-उतारांनी एका व्यक्तीचे आयुष्य कसे बदलू शकते, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. एकेकाळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवणारा प्राध्यापक, केवळ हलाखीच्या परिस्थितीमुळे चोर बनला आहे. बोरिवली रेल्वे स्थानकात एका प्रवाशाचा मोबाईल चोरताना त्याला रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) रंगेहाथ पकडले. शुभ्रत श्रीवास्तव (वय 54) असे या प्राध्यापकाचे नाव आहे.
ही घटना बोरिवली स्थानकातील आहे. प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या एका प्रवाशाच्या खिशातून एक व्यक्ती मोबाईल चोरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. नियंत्रण कक्षातील एका कर्मचाऱ्याने हे दृश्य पाहताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या व्यक्तीला अटक केली.
पोलिसांना धक्कादायक माहिती
अटक केल्यानंतर शुभ्रत श्रीवास्तवची चौकशी केली असता, पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला श्रीवास्तव हा एम.ए. आणि बी.एड. पदवीधर असून, तो एकेकाळी भाईंदर आणि कांदिवली येथील महाविद्यालयांमध्ये इंग्रजीचा प्राध्यापक होता. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने नोकरी सोडली.
नोकरी गेल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आणि त्याला घर सोडावे लागले. तो वसईतील लॉजेसमध्ये राहायला लागला. पैशांची चणचण भासू लागल्यावर त्याने मोबाईल चोरीचा मार्ग पत्करल्याचे समोर आले आहे.
बोरिवली रेल्वे पोलिसांनी
श्रीवास्तवविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून, त्याने यापूर्वीही अशा प्रकारे चोरी केली आहे का याचा तपास सुरू आहे. परिस्थितीने एका सुशिक्षित व्यक्तीला गुन्हेगारीच्या मार्गावर कसे आणले, याचे हे प्रकरण समाजातील अनेक समस्यांवर प्रकाश टाकणारे आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…