Mumbai Car Robbery News : मुंबईत कार चोरीचे प्रमाण वाढलं आहे. त्याअनुषंगाने या कार चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक तैनात ठेवण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांच्या गुन्हेप्रकटीकरण पथकाने केवळ 24 तासात तिन्ही आरोपींना केले जेरबंद
मुंबई :- मुंबईत कार चोरी Mumbai Car Robbery करणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. Mumbai Crime Branch पोलिसांनी आरोपींकडून होंडा सिटी ज्याची किंमत 17.50 लाखांची कार हस्तगत करण्यात आली आहे.पोलिसांनी एकूण तीन चोरट्यांना पकडले असून या गुन्ह्यात आणखी कार चोरी केल्या आहेत काय याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. Mumbai Police पोलिसांनी आरोपींना केवळ 24 तासात मुंबईच्या वडाळा,लोअर परेल, प्रभादेवी या परिसरातून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रूबी भारतेंडू सक्सेना, (वय 38) यांची होंडा सिटी हि कार ज्याची किंमत 17.50 लाख ही 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर च्या दरम्यान फिर्यादी यांचे ड्रायव्हर शुभम यांने रेल्वे बेकरीशेजारील एच पी पेट्रोलपंप, आर आर रोड, गिरगांव, मुंबई येथील पार्कींगला पार्क करून राहते घरी नालासोपारा येथे लावली होती. सोमवार 9 डिसेंबर च्या पहाटे सुमारास गाडी धुण्याकरीता बलराम आला असता. त्यास सक्सेना यांची पार्कीगला लावलेली कार मिळून आली नाही. फिर्यादी यांची होंडा सिटी कार चोरीला गेली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी कलम 303(2), 112(2), 3(5) बी.एन.एस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मुंबईत कार चोरीचे प्रमाण वाढलं आहे. त्याअनुषंगाने या कार चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तैनात ठेवण्यात आलं होतं. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास तुपे आणि त्यांचे पथक यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने तीन आरोपीला मुंबईच्या वडाळा लोअर परेल आणि प्रभादेवी परिसरातून ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी आरोपींकडून 17.50 लाखांची होंडा सिटी कार हस्तगत केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलिसांकडून चालू आहे.
पोलीस पथक
दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त, मुंबई अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, मुंबई मोहीतकुमार गर्ग सारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, ज्ञानेश्वर वाघ-गि.विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक सागर टिळेकर (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक विलास तुपे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष होगले, पोलीस हवालदार संदीप तळेकर, पोलीस शिपाई मयुर पालवणकर,शेखर अभंग,संदीप बेडकुळे, उत्तम कांबळे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…