मुंबई

Mumbai Crime News : एक कोटी 42 लाखांचे कोकेन जप्त – नायजेरियन महिला अटकेत!

अंधेरी पश्चिमेत वर्सोवा पोलिसांची कारवाई

मुंबई | अंधेरी पश्चिम येथील म्हाडा परिसरात गस्त घालत असताना वर्सोवा पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या नायजेरियन महिलेकडून तब्बल 415 ग्रॅम वजनाचे 30 कोकेन कॅप्सूल हस्तगत केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 1 कोटी 42 लाख इतकी आहे. पोलिसांनी या प्रकरणी नायजेरियन महिलेला अटक केली असून, तिच्याविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई 30 जून 2025 रोजी रात्री 3 वाजता करण्यात आली. ओल्ड म्हाडा परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना ही महिला संशयास्पदरीत्या वागत असल्याचे आढळून आले. महिला पोलीस अंमलदाराच्या मदतीने तिच्याकडील बॅग तपासल्यावर त्यात कोकेनने भरलेल्या 30 कॅप्सूल सापडल्या. त्यानंतर तिला तात्काळ अटक करण्यात आली.

येना खिस्तीना इडोवा (वय 34, मूळ रहिवासी ओनडो, नायजेरिया असून, सध्या ती नोएडा, नवी दिल्ली) येथे वास्तव्यास होती. तिच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याचे कलम 8 (क), 21(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ अधिकारीगणांच्या समन्वयातून वर्सोवा पोलिसांनी केली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना गाडेकर आणि त्यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0