मुंबई

Mumbai Crime News : रिक्षाचालकावर चॉपरने हल्ला – ‘शेरू’ आणि ‘चिंटू’ला जंगलातून अटक

कुर्ल्यात चॉपरने थेट हल्ला; पोलिसांचा सापळा अचूक!वडिलांच्या छातीवर चॉपरचा घाव, रस्त्यावर उघडपणे दहशतीचा नंगानाच

मुंबई – शहराच्या मध्यवर्ती कुर्ला परिसरात रिक्षाचालक आणि त्याच्या कुटुंबीयांवर चॉपरने थरारक हल्ला करून फरार झालेल्या दोघा कुख्यात गुन्हेगारांना ठाण्याच्या डोंगरीपाडा जंगल परिसरातून पोलिसांनी शिताफीने जेरबंद केलं. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

13 मेच्या रात्री रिक्षावाल्याने पैसे दिल्यावर घरी परतताना, सराईत गुन्हेगार दत्ता उर्फ ‘शेरू’ व महेश उर्फ ‘पांडा’ यांनी त्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या भाऊजींच्या हातावर चॉपरने जबर वार करण्यात आला, तर वडिलांच्या छातीवर चॉपर घालून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रतिक सकपाळ व इतर साथीदारांनी देखील रस्त्यावर दहशत माजवत लोकांना धमकावले.

या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला वेग दिला. पोलिस उपायुक्त परिमंडळ -5 व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दोन खास पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाअंती ठाण्याच्या डोंगरीपाडा जंगल परिसरात सापळा रचण्यात आला. त्यामध्ये दत्ता उर्फ ‘शेरू’ (30 वय ) आणि मनिष उर्फ ‘चिंटू’ (24 वय) हे दोघे अटक झाले.

पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, पोलीस उप आयुक्त गणेश गावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त संभाजी मुरकुटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र श्रीरसागर, पोलीस निरीक्षक गुन्हे शिवानंद देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे, पोलीस उपनिरीक्षक अमर चेडे, पोलीस हवालदार गांगुर्डे, गवारे पोलीस शिपाई सांगळे, परदेशी, महाजन, पाटील, मालगुंडे, विशे, उगले व पथक यांनी केली आहे

vivek

Recent Posts