Mumbai Latest Crime News : लॉजमध्ये बनावट डॉलरची जादू; 42 बंडल, केमिकल आणि रोखसह टोळी अटकेत
मुंबई | “अमेरिकन डॉलर हवे का? तेही बाजारभावाच्या निम्म्या किमतीत!” — अशा आमिषाने अनेकांना जाळ्यात ओढणाऱ्या सराईत फसवेखोर टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या कक्ष-6 Mumbai Crime Branch Unit 6 पथकाने केला आहे. स्वस्त डॉलर देतो म्हणत विश्वास संपादन करून, काळ्या कागदांचं ‘चलन’ थोपवणाऱ्या या टोळीला अखेर अटक करण्यात आली आहे. Mumbai Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे रईस अहमद सय्यद, अबिदूर रेहमान शहा, अफजलअली सय्यद आणि आदिल साहिल खान. हे सर्व आरोपी मानखुर्द येथील टी-जंक्शनमधील लॉजमध्ये आपली ‘काळ्या डॉलर्सची प्रयोगशाळा’ चालवत होते.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकताच, चौघांना ताब्यात घेण्यात आले आणि 42 बनावट डॉलरच्या बंडल, केमिकलचे डबे, 6 मोबाइल फोन आणि 30,600 रुपये रोख रक्कम असा एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फसवणुकीसाठी ही टोळी खऱ्या डॉलरच्या काही नोटांवर काळा रंग फासून त्यांना बनावट वाटावं असं भासवायची. ग्राहकाच्या समोर त्या नोटा एका ‘विशेष रसायनात’ बुडवून परत खऱ्यासारखं रूप दाखवायची. आणि मग संपूर्ण बंडलमध्ये असेच ‘डॉलर’ असल्याचं सांगून, प्रत्यक्षात काळ्या कागदांचं बंडल देत आरोपी पसार व्हायचे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…