Mumbai Crime News : “खाकीचा काळा चेहरा!” – विनयभंगप्रकरणी वर्षभरानंतर रेल्वे पोलिसावर गुन्हा दाखल

Mumbai Police Latest Crime News : सीएसएमटी स्थानकावरील मध्यरात्रीचा धक्कादायक प्रकार,पीडित महिलेची वर्षभरानंतर घेतलेली धाडसी पावले
मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकावर एकटीने ट्रेनची वाट पाहणाऱ्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या रेल्वे पोलिसाविरोधात अखेर वर्षभरानंतर गुन्हा दाखल झाला आहे.हा धक्कादायक प्रकार जून 2024 मध्ये घडला होता. RPF Constable नागपूरची 39 वर्षीय महिला गुजरातमधून परत मुंबईत आली असताना मध्यरात्री सीएसएमटी स्थानकावर बाकावर बसून गाडीची वाट पाहत होती. याच दरम्यान, तिथे रात्रपाळीत कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार चांगदेव कराळे (54 वय) याने तिच्यावर अश्लील विनयभंग केला. Mumbai Police Latest Crime News
महिलेला एकटी पाहून त्याने चौकशी करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. जेव्हा तिने त्यास विरोध केला, तेव्हा त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हा प्रसंग एक प्रवाशाच्या लक्षात आला आणि त्याने पोलिसाला थांबवले. इतर पोलीस जमा झाले, मात्र भीतीपोटी महिलेने तक्रार देण्यास नकार दिला.
कराळे याला त्या वेळी निलंबित करून मुख्यालयात बदली करण्यात आली होती. मात्र कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नव्हता.परंतु, या घटनेपासून वर्षभरानंतर पीडित महिला आपल्या वडिलांसोबत सीएसएमटी पोलीस ठाण्यात Mumbai Police CSMT Station आली आणि घटनेची संपूर्ण माहिती देत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून IPC कलम 354 आणि 354 (A) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


