Mumbai Latest Robbery News : र.अ.कि. मार्ग पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; दोन दशके पोलिसांना गुंगारा देणारा जबरी चोरीचा आरोपी ठाण्यातून जेरबंद
मुंबई :- कायदा कितीही मोठा असला तरी, कायद्याचा हात अखेर लांब असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तब्बल 20 वर्षांपासून फरार असलेल्या एका कुख्यात आरोपीला मुंबईतील र.अ.कि. मार्ग (R.A.K. Marg) पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत कौशल्याने केलेल्या कारवाईत बेड्या ठोकल्या आहेत. Mumbai Latest Crime News
गुन्हा आणि फरार होण्याची कहाणी
सन 2005 मध्ये र.अ.कि. मार्ग पोलीस ठाण्यात कलम 399,402 भादवि. सह कलम 3,25 भा. ह. कायदा अन्वये जबरी चोरीच्या (डकैतीच्या तयारीच्या) आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात एकूण तीन आरोपी होते, त्यापैकी जावेद युसूफ शेख (वय 48 वर्षे) याला तेव्हा अटक करण्यात आली होती. मात्र, जामीन मिळाल्यानंतर त्याने मा. सत्र न्यायालयात हजर राहणे पूर्णपणे थांबवले. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्याला फरार घोषित करत त्याच्याविरुद्ध स्थायी अटक वॉरंट (Permanent Arrest Warrant) जारी केले होते. तेव्हापासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता.
विशेष शोधमोहीम आणि अटक
पोलीस उपायुक्त, परिमंडळ-4 यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या फरार आरोपी विशेष शोधमोहीम राबवली जात आहे. दरम्यान, आरोपी जावेद युसूफ शेख याचा शोध घेत असताना, तो ठाणे शहरामध्ये भाडेतत्वावर राहत असल्याची अत्यंत गोपनीय माहिती र.अ.कि. मार्ग पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास र.अ.कि. मार्ग पोलीस ठाण्याचे पथक त्वरित ठाण्याला रवाना झाले. अत्यंत गोपनीयता आणि अचूक नियोजन साधत, पोलिसांनी ठाणे शहरातून फरार आरोपी जावेद युसूफ शेख याला ताब्यात घेतले आणि त्याला फेरअटक केली.
पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन
न्याय मिळायला उशीर झाला तरी तो नाकारला जात नाही, या म्हणीला सार्थ ठरवत पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्य नारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त विकम देशमाने, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-4 रागसुधा आर, सहायक पोलीस आयुक्त माटुंगा विभाग सचिन कदम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, र.अ.कि. मार्ग पोलीस ठाणे विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप ऐदाळे, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, महागावकर, सहाय्यक फौजदार संभाजी कडलग, पोलीस हवालदार मंगेश बारसिंग, पोलीस शिपाई बाळासाहेब राठोड आणि महिला पोलीस शिपाई निलम लोहार यांनी ही यशस्वी कारवाई केली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…