Mumbai Crime News : मुंबईत वृद्ध महिलेवर वीस वर्षाच्या तरुणाने केला बलात्कार
•78 वर्षीय वृद्ध महिलेवर वीस वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना मुंबईत समोर आला आहे, सीसीटीव्हीमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस
मुंबई :- मुंबईत एका तरुणीवर एका नरधामाने बलात्कार करून तिच्या गुप्तांगावरही इजा केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई येथील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 78 वर्षीय वृद्ध महिलेवर वीस वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याचे घटना समोर आली आहे. घरातील सीसीटीव्हीमुळे या संपूर्ण घटना समोर आली आहे.
प्रकाश मोरिया असे अटक करण्यात आलेल्या वीस वर्षीय तरुणाचे नाव असून त्याच्यावर कलम 64 (1) आणि 332 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करून तातडीने न्यायालयात हजर करण्यात आले आहे. वृद्ध महिलेला विस्मरणाचा त्रास असून याचा गैरफायदा घेत त्या तरुणाने त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे सीसीटीव्हीमध्ये उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला घरात एकटीच होती, या महिलेला डिमेंशिया आणि मेमरी लॉस चा आजार आहे.त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी घरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. या महिलेला घरात एकटी असल्याचे बघून आरोपी घरात शिरला. महिला तिच्या रूममध्ये झोपली असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
घरातील सीसीटीव्हीमुळे हा प्रकार महिलेच्या कुटुंबीयांना समजला. कुटुंबीयांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध चालू केला आणि अटक देखील केली. अटक केल्यावर तातडीने न्यायालयात हजर केले व न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.