All Out Operation अंतर्गत मुंबई पोलिसांनी सराईत 8 गुन्हेगाराला,5 अमली पदार्थाचे खरेदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना अटक
मुंबई :-लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता मुंबई पोलिसांकडून विशेष मोहिमा राबविण्यात येत आहे. नजीकच्या काळातील महत्वाच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने बृहन्मुंबई शहरात 3 मे 2024 रोजी रात्री 11.00 वा ते आज (4 मे 2024) दुपारी रोजी 1.30 वा. दरम्यान All Out Operation राबविण्यात आले. मुंबई शहरातील सर्व 05 हि प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, 13 परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा/संरक्षण/सुरक्षा, 41 विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात All Out Operation ची कार्यवाही केली.
पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर व विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी व कोबिंग चे ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन केले व All Out Operation प्रभावीपणे राबविले.
All Out Operation मध्ये कारवाई करण्यात आली
महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 120,122,135,142अन्वये संशयितरित्या वावरणारे इसमांवर एकुण 175 कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनधिकृत फेरीवाल्यांवर (Hawkars) एकुण 154 कारवाया करण्यात आल्या.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…