All Out Operation : मुंबई पोलिसांची विशेष मोहीम
All Out Operation अंतर्गत मुंबई पोलिसांनी सराईत 8 गुन्हेगाराला,5 अमली पदार्थाचे खरेदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना अटक
मुंबई :-लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता मुंबई पोलिसांकडून विशेष मोहिमा राबविण्यात येत आहे. नजीकच्या काळातील महत्वाच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने बृहन्मुंबई शहरात 3 मे 2024 रोजी रात्री 11.00 वा ते आज (4 मे 2024) दुपारी रोजी 1.30 वा. दरम्यान All Out Operation राबविण्यात आले. मुंबई शहरातील सर्व 05 हि प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, 13 परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा/संरक्षण/सुरक्षा, 41 विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात All Out Operation ची कार्यवाही केली.
पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर व विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी व कोबिंग चे ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन केले व All Out Operation प्रभावीपणे राबविले.
All Out Operation मध्ये कारवाई करण्यात आली
- मुंबई पोलीसांच्या रेकॉर्डवरील 8 पाहिजे/फरारी आरोपींना (Wanted / Absconder) अटक करण्यात आले आहे.
- एकुण 53 अजामीनपात्र वॉरंट (Non Bailable Warrant) ची बजावणी करून आरोपींना कारवाई करण्यात आली.
- अंमली पदार्थ खरेदी/विक्री करणाऱ्या इसमांवर अंमलीपदार्थ विरोधी कायदा (NDPS ACT) अन्वये एकुण 5 कारवाया करण्यात आल्या.
- अवैध शस्त्र (Illegal weapons) बाळगणाऱ्या एकुण 49 कारवाया करण्यात आल्या असून त्यात चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली. अवैध अग्निशस्त्र हत्यारे, बंदूक जप्तीच्या एकुण 2 कारवाया करण्यात आलेल्या आहेत. कारवाईंतर्गत 2 अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली असून 2 आरोपींस अटक करण्यात आली आहे.
- अवैध दारू विक्री / जुगार इ. अवैध धंदयांवर 24 ठिकाणी छापे टाकून, अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले. त्यादरम्यान 30 आरोपींस अटक करण्यात आली.
- मुंबई शहराबाहेर तडीपार केलेले, परंतु मुंबई शहरात विना परवाना प्रवेश केलेल्या तडीपार आरोपींना अटक करण्याचे अनुषंगाने एकुण 62 कारवाया करण्यात आल्या.
महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 120,122,135,142अन्वये संशयितरित्या वावरणारे इसमांवर एकुण 175 कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनधिकृत फेरीवाल्यांवर (Hawkars) एकुण 154 कारवाया करण्यात आल्या.
- बृहन्मुंबई शहरात एकुण 206 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले, त्यामध्ये अभिलेखावरील 964 आरोपी (रेकॉर्डवरील) तपासण्यात आले. त्यामध्ये 230 आरोपी मिळून आले. त्यांचेवर गुणवत्तेप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.
- सर्व पोलीस ठाण्याचे हद्दीत एकुण 111 ठिकाणी नाकाबंदी (Nakabandi) लावण्यात आली होती.
१) त्यामध्ये एकुण 7233 दुचाकी / चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.
२) मोटार वाहन कायद्यान्वये 2440 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
३) कलम 185 मोवाका अन्वये 77 वाहन चालकांवर Drunk & Drive ची कारवाई करण्यात आली. - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने एकुण 800 हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली.
- प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने मर्मस्थळे व संवेदनशिल ठिकाणे एकुण 529 तपासणी करण्यात आले.