Mumbai Crime News : अंमली पदार्थ विरोधी कक्ष ,वरळी युनिट यांची कारवाई ; ड्रग्ज पेडलर अटक, 20 लाखाचे एम.डी अंमली पदार्थ जप्त
•अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपीला शिवडी परिसरातून अटक, 20 लाखाचे एमडी अंमली पदार्थ जप्त
मुंबई :- ललित पाटील प्रकरणानंतर राज्यातील पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या खास करून एमडी हा अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या विरुद्ध कारवाईचा चांगलाच बडगा उभारला आहे. मुंबई पोलिसांच्या वरळी अमली पदार्थ विरोधी पक्षाच्या विविध शिवडी परिसरातून एका ड्रग्ज तस्करी करणाऱ्या पेडलर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 100 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन एम.डी अमली पदार्थ जप्त केला आहे. अमली पदार्थाची किंमत जवळपास एक कोटी 24 लाख रुपये आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल केले आहे आरोपीला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावले आहे. या सर्व गुन्ह्याचा तपास वरळी युनिटचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सावंत हे करत आहे.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर CP Vivek Phansalkar, पोलीस विशेष आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त गुन्हे शशिकुमार मीना,अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाम घुगे, पोलीस उप आयुक्त अमली पदार्थ विरोधी कक्ष गणेशा का मुंबई राजेंद्र शिरतोडे सहाय्यक पोलीस आयुक्त आम्ले पदार्थ विरोधी कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी 2024 मध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई
अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सन 2024 मध्ये एकूण 25 गुन्हे दाखल करून त्यामध्ये एकूण 66 आरोपींना अटक करत त्यांचे ताब्यातून एकूण 34.8 किलो पेक्षा अधिक वजनाचे विविध अंमली पदार्थ व 1200 कोडेन मिश्रीत कफ सिरप बॉटल्स असा एकूण अं. किं. रूपये 32.16 कोटी पेक्षा अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्तीचे एकूण 17 गुन्हे दाखल करून त्यामध्ये 50 आरोपींना अटक केले असून, त्यांचे ताब्यातून एकूण 11.8 किलो पेक्षा अधिक वजनाचा किं. अं. रूपये 23.44 कोटी किंमतीचा मेफेडॉन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.