Mumbai Police Arrested Farar Criminal : सरकारी कामात अडथळा आणि गंभीर जखमी प्रकरणातील फरार आरोपी गेल्या 9 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता
वडाळा :- सरकारी कामात अडथळा आणि गंभीर जखमी प्रकरणातील आरोपीला अखेर र.अ.कि मार्ग पोलीस ठाणे वडाळा यांनी अटक केली आहे. 2015 मध्ये र.अ.की मार्ग पोलीस ठाणे Mumbai Police Station येथे कलम 353 आणि 333 प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने 2015 मध्ये दिले होते.आरोपी श्रीनाथ तानाजी शिंदे (रा. ओस्वाल नगर नालासोपारा) न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. तसेच आरोपीला फरार घोषित करण्यात आले होते. Mumbai Police Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,श्रीनाथ तानाजी शिंदे, (रा.ओस्वाल नगर, नालासोपारा), याला र.अ.कि. मार्ग पोलीस ठाणेचे फरार आरोपी शोध पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पोलीस हवालदार कडलग, पोलीस शिपाई दळवी व महिला पोलीस शिपाई यादव असे पथकाने महाड येथे वृदधाश्रमात असलेले आरोपीचे वडील तानाजी महादेव शिंदे यांचा पत्ता व मोबाईल क्र. प्राप्त करून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचा मुलगा श्रीनाथ हा राहते गावातील रहिवाशांना शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण करत असल्याने गावातील लोकांनी त्याच्या त्रासाल कंटाळून त्याला गावातून बाहेर काढले होते अशी माहीती पोलिसांना दिली. आरोपी श्रीनाथ यांची कसोशिने तपास करून तो 8 नोव्हेंबर रोजी ठाण्याला एका रूग्णालयात असल्याची माहीती गुप्त बातमीदाराकडून प्राप्त झाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी जावून आरोपीला रुग्णालयातून फेर अटक करण्यात आली आहे. Mumbai Police Latest Crime News
पोलीस पथक
बृहन्मुबई पोलीस आयुक्तालयात पाहिजे फरारी अटकेची विशेष मोहिम सध्या सुरू आहे. अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग अनिल पारसकर पोलीस उप आयुक्त परिमंडळ 4, रागसुधा आर सहाय्यक पोलीस आयुक्त माटुंगा विभाग दिपक गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे सो, पोलीस निरीक्षक एदाळे (पो.नि. गुन्हे), सलीम नदाफ (कावसू) यांचेकडून वेळोवळी घेतलेल्या बैठकीदरम्यान मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पोलीस हवालदार सुरेश कडलग, गोपाळ तेली, पोलीस शिपाई बळवंत दळवी व गणेश सदवदे, महिला पोलीस शिपाई यादव (तांत्रिक मदत व कागदपत्रांचे अवलोकन) या पथकाने 9 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस शिाताफीने फेर अटक करून कौशल्यपुर्ण व तांत्रिक पध्दतीने तपास केला आहे. Mumbai Police Latest Crime News