क्राईम न्यूज

Mumbai Crime News : मुंबईत ‘निर्भया’ची पुनरावृत्ती टळली! भरदुपारी धावत्या रिक्षात तरुणीवर हल्ल्याचा थरार

Mumbai Latest crime News : तो’ नराधम शस्त्राचा धाक दाखवून रिक्षात घुसला; 16 वर्षीय तरुणीचा विनयभंग, शहराला हादरवणारी घटना

मुंबई :- मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात, जिथे रोज हजारो स्वप्नं साकार होतात, तिथेच महिलांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. वांद्रे येथे भरदुपारी, वर्दळीच्या रस्त्यावर एका 16 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीला धावत्या रिक्षात भयानक अनुभवाला सामोरं जावं लागलं. सिग्नलवर थांबलेल्या रिक्षात एका विकृत नराधमाने शस्त्राचा धाक दाखवून प्रवेश केला आणि तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या थरारक घटनेने मुंबई हादरली असून, ‘निर्भया’सारख्या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळल्याने सुटकेचा निःश्वास सोडला जात आहे, पण तितकाच संतापही व्यक्त होत आहे. Mumbai Latest crime News

काय घडलं त्या दिवशी?

सोमवारी दुपारी वांद्रे येथील एस. व्ही. रोडवर हे हृदयद्रावक दृश्य घडले. पीडित तरुणी नेहमीप्रमाणे आपल्या महाविद्यालयाकडे रिक्षाने जात होती. सायबा हॉटेलजवळ सिग्नल लागला आणि रिक्षा थांबली. तोच क्षण साधून, एका काळ्या शर्टमधील अनोळखी व्यक्तीने थेट रिक्षात उडी मारली. रिक्षाचालक आणि घाबरलेल्या तरुणीने त्याला खाली उतरण्यास सांगितले, पण त्याने ऐकले नाही. उलट, “मला काही अंतरच पुढे जायचे आहे, दुसरी रिक्षा मिळत नाहीये,” असे खोटे कारण देत तो आतच बसून राहिला.

सिग्नल सुटताच, त्या नराधमाने आपले खरे स्वरूप दाखवले. त्याने आपल्याजवळील धारदार वस्तू बाहेर काढली आणि रिक्षाचालकाला ‘रिक्षा थांबवू नकोस, नाहीतर मारून टाकेन’ अशी थेट धमकी दिली. जीव मुठीत धरून रिक्षाचालकाने रिक्षा पुढे नेली. त्याच धावत्या रिक्षात, मुंबईच्या वर्दळीच्या रस्त्यावर, त्या नराधमाने अश्लील शेरेबाजी करत 16 वर्षांच्या तरुणीचा विनयभंग केला. पुढील सिग्नलवर रिक्षा थांबताच, संधी साधून तो क्रूर आरोपी रिक्षातून उतरला आणि गर्दीत पसार झाला.

vivek

Recent Posts