मुंबई

Mumbai Crime News : मुंबई गुन्हे शाखेचा मोठा पराक्रम – २८ गुन्ह्यांचा आरोपी शब्बीर ‘सन्नी’ अखेर पोलिसांच्या ताब्यात!

मुंबई | महाराष्ट्र आणि गोवा राज्यात तब्बल २८ गंभीर गुन्ह्यांत वॉण्टेड असलेला शब्बीर शेरअली मर्चष्ट उर्फ शब्बीर शेर अली विरजी उर्फ ‘सन्नी’ (वय ५२) याला अखेर गुन्हे शाखा कक्ष–१ च्या पथकाने अचूक तांत्रिक तपासाद्वारे वसई (पालघर) येथून जेरबंद केले.

गुन्ह्यांची थरारक यादी

म.र.आ. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई : ९ गुन्हे

कफ परेड पोलीस ठाणे : ११ गुन्हे

मरीन ड्राईव्ह : ५ गुन्हे

चेंबूर : १ गुन्हा

माणिकपुर (पालघर) : १ गुन्हा

परवरीम (गोवा) : १ गुन्हा

घरफोडी, चोरी, फसवणूक आणि जुगार कायद्यांतर्गत दाखल असलेल्या या गुन्ह्यांत तो वारंवार न्यायालयात हजर राहत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्यावर अजामीनपात्र व स्टँडिंग वॉरंट जारी केले होते.

कसून तपास व पथकाची धडाकेबाज कारवाई
तांत्रिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा कक्ष–१ च्या पथकाने वसई परिसरात सापळा रचत शब्बीरला पकडले. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला म.र.आ. मार्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहाय्यक पोलीस आयुक्त लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उप पोलीस आयुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रभारी पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथकात
सहाय्यक पोलीस निरीक्षक सलमानखान पठाण, देविदास लाब्दे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र शेडगे, धीरज कांबळे आणि त्यांचे सहकारी जवान सहभागी होते.

मुंबई पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मुंबई–गोवा परिसरात घरफोडी व फसवणूक प्रकरणांमध्ये दिलासा मिळाला असून “कायद्याच्या हातातून कोणीही सुटू शकत नाही” हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

vivek

Recent Posts