Mumbai Crime News : व्यवसायामध्ये नुकसान होत असल्यामुळे प्रतिस्पर्ध्याकांना बाहेर काढण्याकरिता काढलेली वेगळी शक्कल
गुन्हे शाखा कक्ष 01,काशिमिरा मार्फत अटक करण्यात यश ; व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याना गुंतविण्यासाठी प्रतिस्पर्धी व्यावसायिकाचे दुकानात जाणीवपुर्वक अग्निशास्त्रे (बंदूक) व जिवंत काडतुस ठेवणाऱ्या तसेच इतर प्रतिस्पर्धी व्यावसायिकाचे दुकानात ठेवण्यासाठी अग्नीशस्त्रे व जिवंत काडतुस स्वतः जवळ बाळगणाऱ्या आरोपीला अटक
मिरा रोड :- फिरोज ऊर्फ इब्राहीम आलम शफीऊल्ला चौधरी याला व्यवसायामध्ये 1) अमान स्टिल किचन इक्वीपमेंट चा मालक अनिस ऊर्फ मुन्ना खान 2) अमान स्टिल किचन इक्वीपमेंट चा मालक कमिल खान ऊर्फ कलिम व 3) शादाब स्टिलचा मालक शादाब यांच्या मुळे भरपुर नुकसान झाले. त्यांना धडा शिकविण्यासाठी त्याचे ओळखीचा व त्याचेकडे पुर्वी काम करणारा मुस्लीम रा. उत्तन ठाणे याचे करवी त्याने 6 गावठी पिस्तुले व जिवंत काडतुसे मागविले. त्यापैकी दोन गावठी पिस्तुले व जिवंत राऊंड तिन दिवसांपुर्वी त्याने स्वतः अनिस ऊर्फ मुन्ना खान याचे अमान स्टिल किचन इक्वीपमेंट या दुकानातील वडापाव/पाणीपुरी साठीचे काऊंटरच्या कपाटामध्ये ठेवले तर दोन पिस्तुले व 12 राऊंड त्याने एका सेंक बॅगेमध्ये ठेवून ते वर्सोवा पुलावरुन खाडीत फेकुन दिले. तसेच त्याचे कडे सापडलेले पिस्तुल व राऊंड तो एक दोन दिवसात अमान स्टिल किचन इक्वीपमेंट चा मालक कमिल खान ऊर्फ कलिम याचे दुकानात ठेवणार होता. तसेच शाकीर अब्दुल वहाब चौधरी याचे ताब्यात मिळून आलेले पिस्तुल व राऊंड तो एक दोन दिवसात शादाब स्टिलचा मालक शादाब याचे दुकानात ठेवणार होता अशी माहीती दिली. Mumbai Crime News
30 मार्च रोजी पोलीस हवालदार सावंत यांना मिळाली की, गोल्डन नेस्ट सर्कल जवळ असणाया अलम स्टील अँड फर्नीचर, येथे काम करणाया इसमां कडे विनापरवाना पिस्टल व जिवंत राउंड आहेत. सदरची माहीती मा. वरिष्ठांना कळवुन त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर ठिकाणी जाउन शहनिशा करता. इसम नामे 1) फिरोज आलम शफीऊल्ला चौधरी (39 वर्षे), नवघर, भाईंदर पूर्व. ता.जि. ठाणे याच्या ताब्यात 1 गावठी पिस्टल व 10 जिवंत काडतुस तर 2. शाकीर अब्दुल यहाब चौधरी (38 वर्षे,) नयानगर, मिरा रोड,आणि राज्य उत्तर प्रदेश याच्या ताब्यात 1 गावठी पिस्टल व 6 जिवंत काडतुस मिळून आले. बाबत नयानगर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25सह महा. पोलीस अधिनियम 37 (1) (क), 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.कारवाईमध्ये एकूण 4 गावठी पिस्टल व 59 जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहेत. Mumbai Crime News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, श्रीकांत पाठक, अतिरिक्त पोलीस आयुक्त, अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे,प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि-1,मदन बल्लाळ, सहाय्यक, पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा, विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा कक्ष 1 काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुर्वे, सहाय्यक फौजदार संदीप शिंदे, पोलीस हवालदार अविनाश गर्जे, संजय शिंदे, पोहवा संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, सचिन हुले, सचिन सावंत, विजय गायकवाड, सुधीर खोत, विकास राजपुत, पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी,गौरव बारी, धिरज मेंगाणे तसेच काशिमिरा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस उपनिरीक्षक खाडे व पोलीस हवालदार मोहीले यांनी केली आहे. Mumbai Crime News