क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Crime News : चोरी केलेले मोबाईलचे IMEI नंबर क्रेक करून विक्री करणाऱ्या 3 दुकानदारांना अटक, 160 हून अधिक मोबाईल जप्त

Mumbai Police Arrested Second Hand Mobile Selling Robbers : मोबाईल चोरी करणाऱ्या 5 आरोपींना मुंबई, गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे, IMEI नंबर क्रॅक करून नवीन मोबाईल तयार करून राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या राज्यात विक्री करणारी टोळी गजाआड

मुंबई :- मुंबईत मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीचे Mumbai Mobile Robbery रॅकेट सक्रिय आहे. मुंबईत मोबाईल चोरी केलेले मोबाईल विकत घेऊन मग त्यांचा IMEI क्रमांक बदलून ते परराज्यात विकणाऱ्या आणखी आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून 162 मोबाईल फोन, एक लॅपटॉप अशी एकूण 15 लाख 88 हजार आठशे रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने Mumbai Crime Branch या टोळीतील पाच आरोपींना अटक केली आहे. Mumbai Crime News

मुंबई पोलीस गुन्हे शाखा Mumbai Crime Branch कक्ष-6 यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती व त्याच्या साथीदारासह चोरीचे मोबाईल खरेदी करून त्यांचे आयएमईआय क्रमांक बदलून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी आठवडाभर सातत्याने गोपनीय माहिती गोळा करून आरोपी व इतर साथीदार यांचे मोबाईल खरेदी करून त्यांची साठवणूक कुठे करतो.मोबाईलची विक्री कशी व कधी करतो याचा सगळा अभ्यास पोलिसांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी शिवाजीनगर मुंबई या ठिकाणी मुख्य आरोपी याच्या घरावर धाड टाकली. तसेच, तीन मोबाईल विक्री दुरुस्ती करणाऱ्या दुकानावर ही पोलिसांनी छापा टाकून एकूण 162 मोबाईल फोन एक लॅपटॉप असे एकूण 15 लाख 88 हजार आठशे रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. Mumbai Crime News

आरोपीने पोलिसांना सांगितले की, मुंबई शहरातील तसेच राज्यातील विविध परिसरातून चोरी केलेले, स्नॅचिंग केलेले, बिग पॉकेटिंग केलेले मोबाईल विकत घेऊन त्यांचा आय एम इ आय क्रमांक लॅपटॉपच्या द्वारे बदलून ते मोबाईल फोन देशातील विविध राज्यात विक्रीकरिता पाठवत असल्याचे आरोपीने कबुली केले आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 303(2), 336(2), 336 (3), 340 (2), 317(2), 317 (4), 318(4), 61 भा. न्या. संहिता. 2023 अन्वये दाखल करून 05 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालय समोर हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हयाचा पुढील तपास कक्ष-6 गुन्हे शाखा करीत आहे. Mumbai Crime News

पोलीस पथक

विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, Mumbai CP Vivek Phansalkar देवेन भारती पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-1), विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि पूर्व), चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष-6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे, पोलीस उपनिरीक्षक मुठे,रहाणे, माशेरे, बेळणेकर, सावंत,सकपाळ,आव्हाड, सहाय्यक फौजदार देसाई,पारकर, पोलीस हवालदार तुपे,जाधव,वानखेडे,शिंदे,गायकवाड, मोरे, भालेराव, पोलीस शिपाई घेरडे,माळवेकर,कोळेकर, महिला पोलीस शिपाई अभंग, सुतार, पोलीस हवालदार डाळे, कदम,जायभाये आणि पाटील यांचे पथकाने पार पाडली आहे. Mumbai Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0