Mumbai Crime News : 16 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून हत्या
•दहा तासात आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्षा-7 यांची यशस्वी कारवाई
मुंबई :- सुर्यमुखी साईबाबा मंदीराजवळ, डिजीक्यु कॉम्प्लेक्स समोर, घाटकोपर प, मुंबई. येथे राहणाऱ्या सोळा वर्षीय धरणाचा धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची घटना समोर आली या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेणे सुरुवात केली पोलिसांनी तांत्रिक पद्धतीच्या आधारे म्हणजेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून सोळा वर्षाच्या तरुणाच्या हत्याखाली आरोपीला दहा तासात अटक केली.
गुन्हा घडल्यानंतर गुन्हयाचा समांतर तपास तात्काळ कक्ष कार्यालयाकडून सुरू करण्यात आला. कक्ष-7 कार्यालयाचे 04 पथके तयार करण्यात आली. पथकाने सर्वप्रथम घटनास्थळी भेट देवून घटनास्थळी व आजूबाजूच्या परीसरात सविस्तर चौकशी करून मयत व खून करणारा अनोळखी इसम यांची नावे निष्पन्न केली. त्यानंतर तांत्रिक तपास तसेच गुप्तबातमीदारांकडून माहिती प्राप्त करण्यात आली. यांतील आरोपी हा दातिवली, दिवा, जि. ठाणे येथे लपून बसला असल्याबाबत खात्रिशीर माहिती प्राप्त झाली. सदर ठिकाणी कक्ष-9 च्या पथकाने जावून आरोपी पुरुष (19 वर्षे) अटक करण्यात आली आहे. घाटकोपर पोलीस ठाणे गकलम 302 भादंवि सह 135, 37 (1) (अ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर CP Vivek Phansalkar, विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशी कुमार मिना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-1), विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व), चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महेश तावडे, पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम, स्वप्निल काळे, महेश शेलार, नामदेव परबळकर, सहाय्यक फौजदार तानाजी उबाळे, पोलीस हवालदार संतोष गुरव,शशिकांत कांबळे,अजय बल्लाळ, विनोद पांडे,सचिन गलांडे, पोलीस शिपाई विकास होनमाने,महेश सावंत, पोलीस हवालदार राजाराम कदम यांनी पार पाडली आहे.