Beed Latest Bribe News : भूमिगत नालीच्या बिलावर सहीसाठी 80 हजारांची मागणी
बीड | “सही करतो… पण खर्चाचं काय?” अशा संकेतांनी सुरुवात होऊन अखेर थेट 80 हजार रुपयांवर लाचखोरीची मागणी. पण, ज्यांच्यावर जबाबदारी, त्यांनीच केली सौदेबाजी — आणि अखेर ‘कायदा’ने ‘सपडले’! Beed Latest Crime News
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत दोन अधिकाऱ्यांनी भूमिगत नालीच्या कामाचे अंतिम बिल मंजूर करण्यासाठी 80 हजारांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शड्डू ठोकत दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले.
1.मुकुंद आंधळे (वय 33) — उप कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बीड
2.किरण हिवाळे (वय 45) — वरिष्ठ सहाय्यक, पाणीपुरवठा विभाग
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, पिंपळवंडी (ता. पाटोदा) येथील सांडपाणी व्यवस्थापन योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या नालीच्या कामाचे अंतिम बिल मंजूर करण्यासाठी 30 हजार अधिक जुन्या कामाचे 50 हजार — एकूण 80 हजारांची मागणी करण्यात आली होती.25 जून रोजी सापळा रचण्यात आला. आरोपी किरण हिवाळे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात 80,000 रुपये स्वीकारले. याच वेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडले.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपासासाठी दोन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे.
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB),मुकुंद आघाव – अप्पर पोलीस अधीक्षक,सोपान चिटमपल्ले – पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान कवडे – पोलीस निरीक्षक, ACB बीड – सापळा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अधीक्षक सोपान चिटमपल्ले, पोलीस निरीक्षक समाधान कवडे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे आणि पोलीस अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, अविनाश गवळी, अमोल खरसाडे, संतोष राठोड, प्रदीप सुरवसे, अंबादास पुरी या पथकाने कारवाई केली आहे
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…