क्राईम न्यूज

Mumbai Crime Branch : बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या सहा अफगाणी नागरिकांवर मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

Mumbai Crime Branch Arrested Afghani Migrants : कुलाबा, धारावी परिसरात बनावट नावाने राहत होते; व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अवैधरित्या मुक्काम

मुंबई :- मुंबई शहरात बनावट नावाने आणि कागदपत्रांच्या आधारे अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या सहा अफगाणी नागरिकांना मुंबई गुन्हे शाखेच्या Mumbai Crime Branch पथकांनी जेरबंद केले आहे. कुलाबा आणि धारावी परिसरात हे नागरिक अवैधरित्या राहत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखा कक्ष-1 आणि कक्ष-5 Mumbai Crime Branch Unit 1 च्या पथकांनी स्वतंत्रपणे तपास करत परिसरात लक्ष ठेवले आणि सापळा रचून या सहा अफगाणी नागरिकांना पकडले. Mumbai Latest Crime News

प्राथमिक विचारपूस करताना या इसमांनी त्यांची खोटी नावे सांगितली. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक बाबींच्या आधारे आणि कौशल्यपूर्ण चौकशी केली असता, त्यांनी आपण अफगाणी नागरिक असल्याची कबुली दिली. हे सर्व नागरिक 2015, 2017 आणि 2019 मध्ये वैद्यकीय व्हिसावर भारतात आले होते. त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते बनावट नावाने भारतात अवैधरित्या वास्तव्य करत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. Mumbai Police Latest News

कारवाई करण्यात आलेल्या सहा अफगाणी नागरिकांची मूळ नावे अब्दुल समद हाजी अहमद झाई नौरोजी (वय 47, मूळ गाव दुराही, कंधार), मोहम्मद रसोल कमलुद्दीन खाकसर (वय 24, मूळ गाव नवा काबुल), अमील उल्लाह (वय 48, मूळ गाव झाबुल), झिया उल हक अहमदी (वय 36, मूळ गाव काबुल), मोहंमद इब्राहिम गजनवी (वय 36, मूळ गाव काबुल) आणि असद खान तारा काई (वय 36, मूळ गाव काबुल) अशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. Mumbai Police Arrested Afghani People

अशा प्रकारे भारतामध्ये बनावट नावाने आणि कागदपत्रांच्या आधारे अवैधरित्या राहत असलेल्या अफगाणी नागरिकांना पकडण्यात गुन्हे शाखेच्या पथकांना यश मिळाले आहे. या सहाही अफगाणी नागरिकांना पुढील कार्यवाहीसाठी त्यांच्या मूळ देशात अफगानिस्तान येथे परत पाठविण्यात येत आहे. पोलीस आयुक्त, मुंबई, देवेन भारती यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी पार पाडण्यात आली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago