क्राईम न्यूज

Mumbai Crime Beanch : कोट्यवधींच्या फसवणुकीचे रॅकेट उघडकीस! ई-कॉमर्स कंपन्यांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीस गुन्हे शाखा ‘कक्ष-8’ कडून अटक

Mumbai Crime Branch Unit 8 Latest News : बारकोड अदलाबदलीने महागड्या वस्तूंची चोरी; अटकेतील आरोपी हरियाणा आणि छत्तीसगडमधील ; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई :- ई-कॉमर्स कंपन्यांना ‘बारकोड अदलाबदली’ या अनोख्या पद्धतीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-8 mumbai Crime Branch Unit 8 ने बोरीवली परिसरात रंगेहात पकडून एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 45 लाख 9 हजार 333 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. Mumbai Latest Fraud News

गुन्हे शाखेला 6 ऑक्टोबर 2025 रोजी गुप्त माहिती मिळाली की, काही सराईत गुन्हेगार एका प्रथितयश ई-कॉमर्स कंपनीच्या डिलिव्हरी बॉयसोबत संगनमत करून फसवणूक करत आहेत. हे आरोपी महागड्या आणि स्वस्त अशा दोन वस्तूंची ऑर्डर देऊन, त्यांची डिलिव्हरी त्रयस्थ ठिकाणी स्वीकारत. डिलिव्हरी घेताना ते अत्यंत चलाखीने महागड्या वस्तूच्या बॉक्सवरील बारकोड स्टिकर काढून स्वस्त वस्तूच्या बॉक्सवर चिकटवत आणि स्वस्त वस्तूचा बारकोड महागड्या बॉक्सवर लावत. त्यानंतर, ते महागड्या वस्तूच्या नावाने स्वस्त वस्तूचा बॉक्स कंपनीकडे परत करून रिफंडचे (पैसे परत) पैसे स्वीकारत. अशा प्रकारे ते किंमती वस्तू स्वतःकडे ठेवून घेत असत. Mumbai Latest E Commerce Fraud News

ही टोळी 6 ऑक्टोबर 2025 रोजी बोरीवली पश्चिम येथील चंदावरकर मार्गावर डिलिव्हरी घेण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या ‘कक्ष-8’ च्या पथकाने सापळा रचला. या कारवाईदरम्यान डिलिव्हरी बॉयसह डिलिव्हरी घेण्यासाठी आलेले तीन इसम, असे एकूण चार जण बारकोड स्टिकरची अदलाबदली करताना रंगेहात पकडले गेले.

अटकेतील चारही आरोपी हरियाणा (3 आरोपी) आणि छत्तीसगड (1 आरोपी) येथील असून, त्यांच्याविरुद्ध बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 34 लाख रुपयांहून अधिक किमतीचे इलेक्ट्रॉनिक सामान, डिलिव्हरी टेम्पो आणि क्रेटा मोटारकार असा एकूण 45 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्ष-8 ने ही यशस्वी मोहीम पार पाडली आहे. न्यायालयाने आरोपींना 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago