मुंबईक्राईम न्यूज

Mumbai Crime Alert ” साकीनाका परिसरात अज्ञात ड्रोन दिसला ; पोलीस यंत्रणेकडून शोध मोहीम सुरू

Mumbai Police Crime Alert : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून देशातील महत्त्वाच्या शहरांना रेड अलर्ट दिला असताना मुंबईतील साकीनाका परिसरात अज्ञात ड्रोन दिसल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली

मुंबई :- भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांना तसेच सीमाभागावरील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला असताना मुंबईतील साकीनाका परिसरात अज्ञात ड्रोन दिसल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. Mumbai Police Crime Alert त्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. सहार विमानतळाने याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली.

साकीनाका पोलिसांच्या हद्दीत हजरत जय्यब जलाल (गैबन शाह दर्गा) मशिदीजवळ ड्रोन आढळल्याची माहिती खासगी सुरक्षा रक्षकाकडून देण्यात आली. तो ड्रोन काही काळाने जवळच्या परिसरातील झोपडपट्टीमध्ये गेला. सहार विमानतळाने शुक्रवारी पहाटे 5 च्या सुमारास मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर तात्काळ स्थानिक साकीनाका पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे.

फोन करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून त्याला संबंधित ड्रोनचे चित्रीकरण करण्यास सांगण्यात आले तसेच पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली. विशेष करून येथील झोपडपट्टी परिसरात ड्रोन आढळला होता. तसेच संबंधित ड्रोनबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. दोन पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या पथकाच्या माध्यमातून परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0