एका दिवसात 66 नवे रुग्ण – मुंबईतच 31; मृत्युमुखी पडलेले रुग्ण आधीपासून गंभीर आजारांनी ग्रस्त
मुंबई :- राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचे सावट गडद होऊ लागले आहे. मंगळवारी (27 मे) महाराष्ट्रात एकूण 66 नवे कोविड रुग्ण आढळले, त्यातील सर्वाधिक 31 केसेस मुंबईतील आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या आता 325 वर पोहोचली आहे. मुंबईतील घनदाट लोकवस्ती आणि वर्दळीतून संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
यापूर्वी सोमवारी 69 नवे रुग्ण सापडले होते. त्यात मुंबई (37), ठाणे (19), नवी मुंबई (7), पुणे (2) व रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर आणि पिंपरी चिंचवड येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश होता. सोमवारी 87 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती, त्यामुळे क्षणिक दिलासा मिळाला होता.
दरम्यान, जानेवारी 2025 पासून आतापर्यंत राज्यात 4 जणांचा कोविड संबंधित गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला आहे. यापैकी एक रुग्ण हायपोकॅल्सेमिक सीझर व नेफ्रोटिक सिंड्रोम, दुसरा कॅन्सर, तिसरा स्ट्रोक (सेरेब्रोव्हॅस्कुलर आजार) तर चौथा रुग्ण डायबेटिक कीटोऍसिडोसिस आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन या आजारांनी ग्रस्त होता, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…