ठाणेमुंबई
Trending

KDMC News : कल्याणमध्ये ‘राज-एकनाथ’ युती! मनसेचा शिवसेनेला पाठिंबा; ठाकरेंच्या 4 नगरसेवकांच्या माघारीनंतर शिंदेंचे पारडे जड

KDMC Latest News : ठाकरे गटाचे 2 नगरसेवक मनसेत, तर 2 गायब; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेची खेळी? श्रीकांत शिंदेंनी कोकण भवनात केली घोषणा

कल्याण | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत KDMC Election बहुमतासाठी आवश्यक असलेला 62 हा आकडा गाठण्यासाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच, मनसेने शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकण भवनात ही माहिती दिली. या पाठिंब्यामुळे शिंदे गटाचे संख्याबळ आता 60 (53 शिवसेना + 7 मनसे) च्या वर गेले असून, ते बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.

ठाकरे गटात मोठी गळती ठाकरे गटाचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले होते, परंतु त्यापैकी 4 जणांनी पक्षाची साथ सोडली आहे:

मनसेत घरवापसी: स्वप्नील केणे आणि राहुल कोट या दोन नगरसेवकांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे. पूर्वी हे दोघेही मनसेचेच कार्यकर्ते होते.

नॉट रिचेबल: मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक गेल्या दोन दिवसांपासून गायब असून ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

या फुटीमुळे ठाकरे गटाचे संख्याबळ 11 वरून थेट 7 वर आले आहे.

विकासाच्या मुद्द्यावर एकत्र!

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, “कल्याण-डोंबिवलीच्या विकासकामात अडथळा येऊ नये, म्हणून मनसेने आम्हाला मनापासून पाठिंबा दिला आहे. आम्ही भाजपला सोडून सत्ता स्थापन करणार नाही, मात्र महायुतीचा महापौर कोण होणार, याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेतील.”

ठाकरे गटाचा कारवाईचा इशारा कोकण भवनात नोंदणीवेळी गैरहजर राहिलेल्या आणि पक्षाच्या ‘मशाल’ चिन्हावर निवडून येऊनही विरोधात जाणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दिला आहे.

KDMC सत्ता समीकरणाचे ताजे चित्र (बहुमत 62):

गट नगरसेवक संख्या
शिवसेना (शिंदे गट) 53
मनसे (MNS) 07 (5 मूळ + 2 ठाकरे गटातून आलेले)
एकूण (शिवसेना + मनसे) 60
भारतीय जनता पक्ष (BJP) 50
शिवसेना (UBT – ठाकरे गट) 07

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0