Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोड फेज-2 चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी अजित पवार यांचा कडून उद्घाटन
Mumbai Coastal Road Phase 2 Inauguration Today News : मुंबईकरांना कोस्टल रोड खुला, मरीन ड्राईव्ह ते हाजी अली आता केवळ 9 मिनिटात
मुंबई :- वाहतूक कोंडी पासून मुंबईकरांना आता समस्या सुटली आहे. बहुचर्चित आणि भाऊ प्रतिक्षित असलेला पोस्टल रोड चे उत्तरवाहिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आणि अजित पवार Ajit Pawar यांच्या उपस्थितीत आज पासून मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे. या मार्गावरून मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पासून ते हजी आली पर्यंत केवळ मुंबईकरांना आता नऊ मिनिटात प्रवास करता येणार आहे तसेच मुंबईची वाहतूक कोंडी वर होणारा परिणाम आता कमी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विंटेज कार मधून हा प्रवास केला असून या प्रवासात राज्याचे उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते. Mumbai Coastal Road News Today
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी आजपासून खुली करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पाहणी केली आहे.
उत्तर वाहिनी मार्गिका खुला केल्यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून सुमारे पाऊण तासांचे हे अंतर अवघ्या 10 मिनिटात कापता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. भुलाभाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली चौक) पर्यंत जाणे सुलभ होणार आहे. Mumbai Coastal Road News Today
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या सागरी किनारा मार्गाचा पहिला 9 किलोमीटरचा टप्पा खुला केला होता. आजपासून सव्वा सहा किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला झाला आहे. सागरी किनारा मार्गाचा नरिमन पॉईंट येथून वरळीपर्यंत जाणाऱ्या मार्गाची पाहणी केली. नरिमन पॉईंट ते हाजीअलीपर्यंतच्या सव्वा सहा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला आहे. जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा तिसरा टप्पाही सुरू होईल.
हा बोगदा अत्यंत अद्ययावत पध्दतीने बांधण्यात आला असून अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्वतः या फोनवरुन नियंत्रण कक्षाशी आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो त्याची माहिती जाणून घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विंटेज कार मधून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रवास करीत बोगद्याची पाहणी केली. Mumbai Coastal Road News Today
Web Title : Mumbai Coastal Road: Mumbai Coastal Road Phase-2 inaugurated by Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar