Mumbai Andheri Police Arrested Chain Snacher: अंधेरी पोलिसांची वर्षभराची मेहनत फळाला; सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला बेड्या
मुंबई: मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना गोड बोलण्यात गुंतवून त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करणाऱ्या एका कुख्यात आणि सराईत गुन्हेगाराला अंधेरी पोलिसांनी Andheri Police मोठ्या शिताफीने अटक केली आहे. तब्बल 40 हून अधिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ‘वॉन्टेड’ असलेला हा आरोपी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथून जेरबंद करण्यात आला आहे. त्याच्या अटकेमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या फसवणुकीचे किमान सहा नवीन गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारांवरील वचक पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. Mumbai Police Latest News
गेल्या वर्षी 15 जुलै 2025 रोजी अंधेरी पूर्वेकडील तेली गल्ली क्रॉस रोडवर एक 74 वर्षीय वृद्ध व्यक्ती चालत असताना, आरोपीने त्यांना बोलण्यात गुंतवले. त्याने मोठ्या चलाखीने त्यांच्या गळ्यातील 28 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन बघण्यासाठी घेतली आणि लक्ष विचलित करून ती घेऊन पळ काढला. या घटनेने अंधेरी परिसरात खळबळ उडाली होती आणि याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीचा ‘मास्टरस्ट्रोक’
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे यांच्या नेतृत्वाखालील अंधेरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने हाती घेतला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीने छत्री घेतल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मात्र, जिद्दीने, पथकाने आरोपी ज्या मार्गाने गेला, त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचे सलग पाच दिवस बारकाईने अवलोकन केले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने आणि मोबाईलचा वापर टाळत असल्याने, त्याला शोधणे हे मोठे आव्हान होते.
पोलिसांच्या सततच्या पाठलागाची कुणकुण लागताच, आरोपी मुनावर उर्फ अन्वर अब्दुल हमीद शेख (वय 50, रा. कुरेशी नगर, कुर्ला, मुंबई) हा रेल्वेने पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ कारवाई करत इगतपुरी (नाशिक) रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला इगतपुरी रेल्वे स्टेशनवर मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. नमुद गुन्ह्यात त्याला अटक करून चोरीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली.
40 पेक्षा अधिक गुन्हे आणि नव्या फसवणुकीचा उलगडा
आरोपी मुनावर उर्फ अन्वर अब्दुल हमीद शेख याच्याकडे केलेल्या कसून चौकशीत त्याने डिसेंबर 2024 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील फसवणुकीचे एकूण सहा नवे गुन्हे उघड केले आहेत. यात अंधेरी, वाकोला, सायन, कांदिवली येथील कस्तुरबा मार्ग, वसई रेल्वे पोलीस ठाणे आणि दादर रेल्वे पोलीस ठाणे येथील गुन्हे समाविष्ट आहेत. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक न्यायालयाचे वॉरंट आणि अजामीनपात्र वॉरंट प्रलंबित आहेत.
ही महत्त्वपूर्ण कामगिरी बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का व सु) अनिल कुंभारे (अति. कार्यभार), अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग परमजित सिंह दहिया, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-10, मुंबई दत्ता नलावडे आणि सहायक पोलीस आयुक्त, अंधेरी विभाग डॉ. शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे, पोलीस हवालदार पेडणेकर, सुर्यवंशी, शिंदे, पोलीस शिपाई लोंढे, म्हात्रे, पाटील, मोरे आणि तांत्रिक मदतीसाठी पोलीस हवालदार विशाल पिसाळ यांनी ही कौतुकास्पद कामगिरी बजावली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…