•समलैंगिक संबंधाच्या व्हिडिओवरून ब्लॅकमेल; दोन आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
मुंबई | सांताक्रूझमध्ये राहणाऱ्या एका 32 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने ब्लॅकमेल आणि मानसिक छळाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्ती राज मोरे याला समलैंगिक संबंधाच्या अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावून तब्बल 3 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप राहुल पारवानी आणि सबा कुरेशी या दोघांवर ठेवण्यात आला आहे.
राज मोरे शीव येथील एका कंपनीत कार्यरत होता आणि सांताक्रूझ येथे आईसोबत राहत होता. सप्टेंबर 2024 मध्ये त्याची ओळख इंस्टाग्रामवरून राहुल पारवानी याच्याशी झाली. ओळख वाढली आणि त्यातून दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. याच संबंधांचा फायदा घेत राहुलची सहकारी सबा कुरेशी हिने त्यांची अश्लील चित्रफीत तयार केली. त्यानंतर दोघांनी मिळून राजवर मानसिक दबाव आणत त्याला सातत्याने ब्लॅकमेल केलं.
18 महिन्यांत अडीच कोटी रुपये आणि महागडी कार घेऊनही दोघांचा छळ थांबला नाही. राज नैराश्यग्रस्त झाला आणि रविवारी संध्याकाळी त्याने घरातच विष प्राशन करून जीवन संपवलं. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या तीन चिठ्ठ्यांत त्याने स्वतःवर झालेल्या अन्यायाचा पाढा उघड केला.
वाकोला पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी, धमकी देणे यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. कलम 308(2), 308(93), 108, आणि 3(5) अंतर्गत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…