क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Bus Driver Murder : मुंबईतील बेस्ट बस कंडक्टरवर चाकूने वार, आरोपीला 4 तासात अटक

Mumbai Bus Driver Murder : मुंबईतील एका बेस्ट बस कंडक्टर यांच्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने हा प्राणघात हल्ला झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे

मुंबई :- मुंबईतील एका बेस्ट बस कंडक्टर Attack On Mumbai BEST Driver यांच्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना 19 सप्टेंबरच्या रात्री घडली आहे.अशोक डगळे (44 वर्ष) असं हल्ला झालेल्या कंडक्टरचे नाव आहे. पायधुनी ते विक्रोळी आगार या मार्गावर बस क्रमांक 7 वर ड्युटीवर असताना अचानक एका अज्ञात व्यक्तींनी चोरीच्या उद्देशाने हल्ला त्यांच्या जवळील असलेल्या पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या जवळील मोबाईल चोरल्याचे पोलीस ठाण्यात Mumbai Police Station तक्रार दिली होती. ही घटना पिवळा बंगला बस स्टॉप च्या कॉर्नर वर धारावी डेपो कडे जाणाऱ्या मार्गावर झाल्याचे पोलीस तक्रार मध्ये सांगण्यात आले आहे. धारावी पोलीस ठाण्यात Dharavi Police Station कंडक्टर यांनी जबाब नोंद करून पोलिसांनी आरोपी च्या विरोधात कलम 309 (4),(6) 311 बीएनएस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (अ),(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावी पोलीस ठाण्याचे गुंडा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास शेलार आणि पथक यांनी गुन्ह्यांच्या घटनास्थळी सीसीटीव्हीची पाहणी करून त्यांना आरोपीबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. पोलिसांच्या खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शाबान खान नावाचा व्यक्ती बस कंडक्टरला चाकू मारून चोरी केल्याची माहिती प्राप्त झाली होती. तसेच, तो धारावीच्या कावळे चाळ परिसरात मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीला अवघ्या चार तासात अटक केले आहे.त्याच्याकडून मोबाईल आणि चाकू जप्त केला आहे Mumbai Latest Crime News

हल्ल्यात अशोक जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायन येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. Mumbai Latest Crime News

पोलीस पथक

पोलीस उपायुक्त श तेजस्विनी सातपुते, परिमंडळ-5, सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी मुरकुटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर, महिला पोलीस निरीक्षक संगिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास शेलार व गुंडा विरोधी पथकाचे पोलीस हवालदार दत्तात्रय वरखडे, पोलीस शिपाई राजेश शिंगटे,बजंरग लांडगे,योगेश सोनार यांनी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0