Mumbai Building Collapses At Bhendi Bazaar In Dongri : मुंबईतील भेंडी बाजार परिसरात शुक्रवारी पहाटे चार मजली इमारतीचा अंशत: भाग कोसळला
मुंबई :- मुंबईतील डोंगरी भेंडी बाजार Mumbai Bhendi Bazar Building Collapse परिसरात निशानपाडा रोडवर मध्यरात्री 12.30 च्या सुमारास इमारातीचा काही भाग कोसळला आहे. चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि इतर लोक ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत.इमारतीजवळ स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडूनदेखील शोध मोहीम राबविली जात आहेत. अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि इतर कर्मचारी ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत.
दरम्यान, इमारतीला अनेक तडे असल्याचा आरोप काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी केला.काँग्रेस आमदार म्हणाले की ही नूर व्हिला नावाची इमारत आहे, त्यात खूप तडे आहेत, निधीची व्यवस्था केली जात होती, पण दुरुस्तीचे काम झाले नाही आणि आज या इमारतीचा काही भाग कोसळला. अग्निशमन दल आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीएमसी, पोलीस आणि अग्निशमन दल मलबा हटवण्याचे काम करत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…