क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Bribe News : म्हाडा अधिकाऱ्याला 40 हजार रुपयांची लाच घेताना ‘एसीबी’कडून रंगेहात अटक

Mumbai ACB Latest Bribe News : अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी मागितली होती 4 लाखांची लाच

मुंबई :- अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या म्हाडाच्या एका अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. Mumbai Anti Corruption Bureau रणजीत बाळासाहेब चव्हाण (वय 50 , पद – स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कार्यकारी अभियंता वांद्रे विभाग, म्हाडा,) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Mumbai Latest Crime News

काय आहे प्रकरण?

तक्रारदार (वय 62 वर्ष) यांच्या रो हाऊसवर अनधिकृत पत्रे चढविण्यात आले होते, तसेच तेथे पेइंग गेस्टचा व्यवसाय सुरू असल्याचा रिपोर्ट पाठवून कारवाई करण्याची धमकी आरोपी रणजीत चव्हाण यांनी दिली होती. ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी सुरुवातीला 4 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचून काल (9 ऑक्टोंबर) रोजी आरोपी चव्हाण यांना तडजोडी अंती ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता 40 हजार रुपये पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडले.

याप्रकरणी आरोपी रणजीत चव्हाण यांच्याविरुद्ध कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या लाचखोरीमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई

या यशस्वी सापळा कारवाईचे मार्गदर्शन संदीप दिवाण (अपर पोलिस आयुक्त, ला.प्र.वि, मुंबई), अनिल घेरडीकर (अपर पोलीस उप आयुक्त, ला.प्र. वि, मुंबई) आणि राजेंद्र सांगळे (अपर पोलीस उप आयुक्त, ला.प्र. वि, मुंबई) यांनी केले. ही कारवाई गणपत परचाके (पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. मुंबई – पर्यवेक्षण अधिकारी) आणि मानसिंग पाटील (सहाय्यक पोलीस आयुक्त, ला.प्र.वि., बृहन्मुंबई – गुन्हा तपास अधिकारी) यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0