Mumbai Latest Bribe News : घरी बसून नोकरी देण्यासाठी मागितली लाच; कनिष्ठ पर्यवेक्षक सुरेश सुरकुळे यांना अटक
मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक सुरेश मारुती सुरकुळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 8 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे, आजारी असलेल्या एका सफाई कामगाराकडून ‘घरी बसून नोकरी’ आणि ‘ठराविक रोड’ देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या घटनेमुळे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील भ्रष्टाचाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. Mumbai Latest Crime News
काय आहे प्रकरण?
कुर्ला येथील एल वॉर्डमध्ये काम करणाऱ्या एका सफाई कामगाराला गेल्या काही काळापासून पाठदुखीचा त्रास होत आहे. नायर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. त्यामुळे कामगार कामावर नियमित जाऊ शकत नव्हता. याच संधीचा फायदा घेत कनिष्ठ पर्यवेक्षक सुरेश सुरकुळे यांनी त्याला मदतीच्या नावाखाली लाचेची मागणी केली. Mumbai BMC Latest Bribe News
‘घरी बसून नोकरी’ची ऑफर
16 सप्टेंबर रोजी पीडित सफाई कामगाराने सुरेश सुरकुळे यांची भेट घेऊन आपली व्यथा सांगितली आणि दुसऱ्या एका कामगाराची मदत मिळावी अशी विनंती केली. तेव्हा सुरकुळे यांनी त्याला धक्कादायक ऑफर दिली. त्यांनी सांगितले की, “दर महिन्याला 7,000 रुपये दे आणि घरी बसून नोकरी कर, किंवा एकदाच 15,000 रुपये देऊन फिक्स रोड घे.” या मागणीमुळे संतप्त झालेल्या कामगाराने 19 सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. Mumbai ACB Trap News
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, एसीबीने सापळा रचून 20 सप्टेंबरच्या संध्याकाळी सुरेश सुरकुळे यांना 8 हजार रुपयांची लाच घेताना पकडले. स्वतःच्या आजारी कर्मचाऱ्याकडूनच लाच घेण्याचा हा प्रकार उघड झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी सुरकुळे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…