क्राईम न्यूजमुंबई
Trending

विरार पोलिसांची कामगिरी : हरवलेले 36 मोबाइल आणि सोन्याचे दागिने रहिवाशांना परत

Virar Police Recover 39 Stolen Mobile : विरार पोलिसांच्या विशेष पथकाने रहिवाशांच्या हरवलेल्या 39 मोबाइलचा शोध घेत हे मोबाइल रहिवाशांना परतही केले आहेत. तसेच या मोबाइलची एकूण किंमत 7 लाख 37 हजाराच्या आसपास असल्याची माहिती पोलिसांनी दिली

विरार :- विरार पोलिसांच्या Virar Police विशेष पथकाने रहिवाशांच्या हरवलेल्या 36 मोबाइलचा शोध घेत हे मोबाइल रहिवाशांना परतही केले आहेत. Virar Police Recover 39 Stolen Mobile तसेच, सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तूही पोलिसांनी नागरिकांना सुपूर्त केल्यानंतर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या मोबाईलचे एकूण किंमत सात लाख 37 हजार 800 रुपये असून सोन्याच्या दागिनेची किंमत एक लाख 90 हजार रुपये असा एकूण मुद्देमाल पोलिसांनी नागरिकांना परत केला आहे.

मोबाइल चोरीला गेल्यानंतर किंवा हरवल्यास लवकर सापडत नाही. कामाच्या व्यापामुळे मोबाइलचा शोध घेण्या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना तितकासा वेळ मिळत नाही. मात्र हरवलेल्या मोबाइलच्या तपासासाठी स्थापन ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने 36 मोबाइलचा शोध घेतला होता. पोलिसांना वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि वेगळ्या राज्यातून हरवलेले मोबाईल शोधून काढण्यास पोलिसांना यश आले आहे.मोबाइलचा तांत्रिकदृष्ट्या शोध घेत मोबाइल विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0