क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Breaking News : महिला डॉक्टर बाथरुममध्ये अंघोळ करत होती, सफाई कामगार करत होता व्हिडिओ, पोलिसांनी केली ही कारवाई

Mumbai Breaking News : महिला डॉक्टर आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी बीएमसी रुग्णालयाच्या सफाई कामगाराला अटक केली आहे. आरोपी 10 वर्षांहून अधिक काळ रुग्णालयात कार्यरत आहे.

मुंबई :- कांदिवली पोलिसांनी Kandivali Police बीएमसी रुग्णालयात BMC Ward काम करणाऱ्या 40 वर्षीय सफाई कामगाराला अटक केली आहे. सफाई कामगाराने महिला डॉक्टर आंघोळ करत असताना तिचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश सोलंकी असे आरोपी सफाई कामगाराचे नाव आहे. तक्रारदार महिला डॉक्टर रुग्णालयातून एमएसचे शिक्षण घेत असून गेल्या दोन वर्षांपासून बीएमसी रुग्णालयात प्रॅक्टिस करत आहेत.

ही घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडल्याचे फिर्यादी महिला डॉक्टरने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितले. ती तिच्या खोलीच्या बाथरुममध्ये आंघोळ करत असताना आरोपी जयेश सोळंकी याने तिचा फोन खिडकीवर ठेवला आणि तिचे रेकॉर्डिंग सुरू केले. हा मोबाईल डॉक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ रुग्णालयाच्या आवारातील इतरांना व वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडून त्याचा मोबाईल काढून घेतला. सोळंकी हे 10 वर्षांहून अधिक काळ त्या रुग्णालयात कार्यरत आहेत.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा फोन तपासला गेला तेव्हा त्यांना व्हिडिओ सापडला, त्यानंतर कांदिवली पोलिस ठाण्यामध्ये BNS च्या कलम 77 अंतर्गत जयेश सोळंकी विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे असुन आरोपी जयेश याला अटक करण्यात आली. हा जामीनपात्र गुन्हा असल्याने आरोपीला पोलीस ठाण्यातूनच जामीन मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले, त्यानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली. आरोपी सोळंकी आपल्या परिवारासोबत बोरिवली परिसरात राहतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0