Mumbai Breaking News Police Arrested Bomb Threat to Blow Person : पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश ; दादर आणि कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बेने उडून अशी धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले अटक
नालासोपारा :- पेल्हार पोलिसांनी Pelhar Police अवघ्या दोन तासांत आरोपीला शोधून त्यांच्या मुसक्या आवळल्या. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षावर एक निनावी दूरध्वनी आला होता. फोन करणाऱ्या इसमाने दादर आणि कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली. यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतल्या असता आरोपीला ताब्यात घेतले आणि धक्कादायक कारण समोर आले आहे .सोडून गेलेल्या बायकोला धडा शिकवण्यासाठी एका व्यक्तीने चक्क दादर आणि कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. Mumbai Breaking News
हा फोन नालासोपारा परिसरातून आला होता, त्यामुळे पेल्हार पोलिसांनी याचा तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी तसेच पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे यांनी रातोरात तांत्रिक विश्लेषण करून तपासाला सुरुवात केली. आरोपीचा मोबाईल क्रमांक बंद होता. पोलिसांनी या फोनची माहिती काढली असता ओम शिवसाई चाळ एवढाच पत्ता मिळत होता. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने रातोरात परिसरातील सर्व ओम शिवसाई नावाच्या चाळी पालथ्या घातल्या. दरम्यान सीसीटीव्ही मध्ये एक संशयित पोलिसांना दिसला. त्यामुळे पोलिसांचे काम सोपे झाले आणि त्याला नालासोपारा येथील बिलालपाडा मधून अटक केली.अटक आरोपीच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाणे भादविस 505 (1) (ब), 505 (2), 182 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे. Mumbai Breaking News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, अप्पर पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर वसई विरार जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त , विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पेल्हार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, सचिन कांबळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार संजय मासाळ, रवि वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, राहुल कर्पे, दिलदार शेख, निखिल मंडलिक, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, नितीन सांगळे, शंकर सुळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.Mumbai Breaking News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…