मुंबई
Trending

Mumbai Breaking News : मुंबई युवक काँग्रेसने या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरले, पोस्टर लावून शिंदे सरकारला फटकारले

Mumbai Yuva Congres Poster News : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई युवक काँग्रेस सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करत आहे. वर्सोव्यासह मुंबईतील अनेक भागात महायुती सरकारच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले आहेत.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election विरोधी पक्षांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबई युवक काँग्रेसकडून महायुती सरकारच्या विरोधात पोस्टर Mumbai Yuva Congres Poster लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स मुंबईतील वर्सोवा, लोखंडवाला आणि इन्फिनिटी मॉल अंधेरी पश्चिम भागात लावण्यात आले आहेत.

पोस्टरच्या माध्यमातून महायुती सरकारला टोला लगावला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबद्दल ‘गुजरातची लाडकी भ्रष्ट आघाडी’ असे लिहिले आहे. यातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

पोस्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ट्रॅक्टरवर बसलेले दाखवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे उद्योग गुजरातमध्ये नेले जात असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0