Mumbai Tadiapar News : मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर ; मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 7 अंतर्गत तब्बल 47 गुन्हेगार तडीपार
mumbai Tadiapar Criminal : विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, पोलिसांकडून कठोर कारवाई, परिमंडळ हद्दीतील तब्बल 47 आरोपींना तडीपार
मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिमंडळ (7) कार्यक्षेत्रातील 47 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. Mumbai Tadipar Criminal विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.शहरातील परिमंडळ (7) कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.पोलीस उप आयुक्त परिमंडळ-7 विजयकांत सागर यांनी आचारसंहिता लागू झाल्या परिमंडळ हद्दीतील तब्बल 47 गुन्हेगारांना मुंबई ठाणे आणि नवी मुंबई या शहराबाहेर हद्दपार केली आहे.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव
विधानसभा निवडणुक शांततामय व सुरक्षित चातावरणात पार पाडण्याकरीता परिमंडळ 7 अंतर्गत येणा-या पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे पोलीस ठाणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये संघटीत होऊन गुन्हे करणारे पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीतील गणेश प्रमोद गुप्ता, आकाश गणेश बटे भांडुप पोलीस ठाणे हद्दीतील विजय सुरेश चंडालिया उर्फ प्रेम, रविंद्र सुरेश चंडालिया उर्फ सलमान, जकतार बलदेव सिंग उर्फ बड़ा काके, शुभम संतोष झेंडे, लक्ष्मण उर्फ प्रितम सतिश कुंचीकुर्वे असे 07 सराईत गुन्हेगार हद्दपार केले आहेत Mumbai Latest Crime News
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अन्वये सक्रिय असलेले घाटकोपर पोलीस ठाणे हद्दीतील प्रमोद सोपान आगोंडे, हबीब याकुब शेख, चेतन अंकुश तावडे पंतनगर पोलीस ठाणे हद्दीतील अस्लम अन्वर खान, कुणाल बालु गरुडश राजन आनंद प्रधान, ईश्वर उर्फ बाबु बबन पटेकर पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीतील गोविंद नरेंद्र दिक्षीत उर्फ मुन्ना दिक्षीत, मोहम्मद आकीब परवेज शेख, अविनाश किशोर कोकणे भांडुप पोलीस ठाणे हद्दीतील गोविंद अर्जुन बागुल, शक्ती भरत पुजारी, नितेश व्यकंट अनभुले, राहुल मोहन डुलगज, उर्फ मल्ल्या, रोहन देवीदास बावस्कर उर्फ खली मुलुंड पोलीस ठाणे हद्दीतील आकाश कैलास केरकट्टी, जिग्नेश रमेश पुरविया नवघर पोलीस ठाणे Navghar Police Station हद्दीतील नरेश दिलीप पवार उर्फ नरीया असे 17 सराईत गुन्हेगार हद्दपार केले आहेत. Mumbai Latest Crime News
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 57 अन्वये गुन्हयात दोषसिध्दी झालेल्या घाटकोपर पोलीस ठाणे हद्दीतील निखिल लक्ष्मण देवरकी, रामु जगनारायण गुप्ता, सागर राव कांबळे, मोहम्मद सरफराज उर्फ पिंटु युसुफ शेख पंतनगर पोलीस ठाणे हद्दीतील उमेष मुकेश वैदय, तुषार उर्फ बाला सुनिल गायकवाड, आनंद बबन सोनवले, अनिरूध्द बबन गायकवाड, वसंत शंकर नायक, सुमेश अशोक शिरसाठ, अमित स्तीपाल शिंदे विक्रोळी पोलीस ठाणे हद्दीतील दिपक अनिल साबळे पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीतील सुधीर मोहन गौड, निलेश नारायण तावरे, भांडुप पोलीस ठाणे हद्दीतील सुरेश रामअवतार चौहान, इम्रान नियतुल्ला खान, विकास संतोष मोनार, विकास भिमा गायकवाड, प्रकाश फिलीप्स बास्नबस उर्फ अण्णा कुट्टी, इरफान मोहम्मद हानिफ खान उर्फ इल्ला कांजुरमार्ग पोलीस ठाणे हद्दीतील मनिष उर्फ वामन सकपाळ मुलुंड पोलीस ठाणे हद्दीतील किरण प्रकाश राणे अशा 22 सराईत गुन्हेगार हद्दपार केले आहेत.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर,विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ. महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 7, मुंबई विजयकांत सागर यांनी कारवाई केली आहे.