Mumbai Police Latest News : उत्तर प्रदेशहून आलेल्या 24 वर्षीय तरुणाकडून तीन पिस्तुले व 10 काडतुसे जप्त
मुंबई | शहराच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या अवैध शस्त्रसाठ्याचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिवडी परिसरात मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशमधून आलेल्या अजयकुमार दिवाकर (24 वय) या तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तीन देशी बनावटीची पिस्तुले, तीन मॅगझिन व दहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
शिवडीतील डॉकयार्ड परिसरात इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ पोलिसांनी सापळा रचून या तरुणाला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करताच आरोपी अजयकुमार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र, झडती दरम्यान सशस्त्र साठा सापडल्यावर त्याने शस्त्रविक्रीसाठी मुंबईत आल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलसह अन्य वस्तू जप्त केल्या असून, तो कोणाच्या संपर्कात होता, याचा सखोल तपास सुरू आहे. शिवडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्रास्त्र प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या गुन्हे शाखा पुढील तपास करत असून, या मागे कार्यरत आंतरराज्यीय शस्त्र विक्री टोळीचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानात अशा अवैध शस्त्र तयार करणाऱ्या टोळ्यांचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आहे. या शस्त्रांचा दर्जाही इतका उन्नत झाला आहे की ते परदेशी शस्त्रांसारखे घातक व अचूक ठरत आहेत. अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारातही अशाच दर्जाची शस्त्रं वापरण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…