मुंबई
Trending
Mumbai Breaking News : राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी
Mumbai Breaking News: नरहरी झिरवळासंह 2 आमदारांनी थेट संरक्षक जाळीवर मारल्या उड्या
मुंबई :-राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ Narhari Zirwal मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या आहे.धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी महायुतीचे आदिवासी आमदार चांगलेच आक्रमक झालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शुक्रवारी यासंबंधी थेट मंत्रालयाच्या जाळीवर उड्या घेत आपला विरोध प्रकट केला. त्यांच्या या आंदोलनामुळे काहीवेळ अवघे मंत्रालयच स्तब्ध झाले होते.
नरहरी झिरवळ मागील काही दिवसांपासून धनगरांच्या विविध मागण्यांकरिता मंत्रालयाच्या गेट समोर आंदोलन करत होते.