Mumbai Breaking News : काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी शिवाजी पार्क येथे केली पाहणी
Bharat Nyay Jodo Yatra In Mumbai : भारत न्याय जोडे यात्राचा उद्या समारोप, उद्या राहुल गांधी शिवाजी पार्क वर करणार भाषण
मुंबई :- राहुल गांधी Rahul Gandhi यांची भारत न्याय जोडो यात्रा Bharat Nyay Jodo Yatra अंतिम टप्प्यात आली आहे. आज दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकांची तारखेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्याच दिवशी आचारसंहिता ही लागू शकते. त्यामुळे उद्याची सभा ही प्रचारात्मक सभा आहे असे समजले जात आहे. राहुल गांधी यांनी मणिपूर येथून काढलेले भारत न्याय जोडो यात्रा आता मुंबईच्या दिशेने येत असून तिचे समारोप मुंबईच्या शिवाजी पार्कच्या मैदानात होणार आहे. या मैदानातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशवासीयांना संबोधित करणार आहे या सभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार केंद्रीय इंडिया आघाडीचे नेते तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहे. उद्याच्या सभेत राहुल गांधी भाजपा सह राज्यातील शिंदे सरकारलाही निशाणा साधणार आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे नेते यांनी आज शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली आहे. Mumbai Breaking News
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांच्यासह आमदार सतेज पाटील, वर्षा गायकवाड सचिन सावंत यांनी शिवाजी पार्कची पाहणी करून उद्याच्या सभे साठी तयारीचा आढावा घेतला आहे. राहुल गांधी यांची भारत न्याय जोडे यात्रा सध्या ठाणे जिल्ह्यात असून ती ठाण्याच्या दिशेने मार्ग कुर्ल्यात दाखल होणार आहे. त्यापूर्वीच वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला असून मुंबईत पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. Mumbai Breaking News